मुंबई, 31 ऑक्टोबर: जर तुम्ही अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना यांसारख्या कोणत्याही पेन्शन योजनेत गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) द्वारे तुमच्या योजनेत पैसे टाकू शकता. आतापर्यंत पेन्शन योजना सदस्यांना IMPS, NEFT, RTGS द्वारे पेमेंट करण्याची सुविधा होती, परंतु यावर्षी PFRDAने (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांचे UPI हँडल लॉन्च केलं आहे, ज्याद्वारे तुम्ही UPI मध्ये प्रवेश करू शकता आणि तुमचे पेमेंट करू शकता. NPS योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाते, तर APY (अटल पेन्शन योजना) असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाते. या पेन्शन योजनांमध्ये तुम्ही UPI द्वारे पैसे भरू शकता. PFRDA.15digitVirtualAccount@axisbank हे PFRDA चे UPI हँडल आहे. तुम्ही तुमचे पैसे त्याच दिवशी D-remitद्वारे स्कीममध्ये टाकू शकता. पीएफआरडीएने म्हटलं आहे की डी रेमिट व्हर्च्युअल खातं हे असोसिएटेड परमनंट अकाउंट नंबरपेक्षा वेगळं असेल. एवढंच नाही तर NPS मध्ये पैसे जोडण्यासाठी तुम्ही सबस्क्राइबर्स ऑटो डेबिट देखील सेट करू शकता. जर त्यांना त्यांचे योगदान दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षभरात जमा करायचे असतील, तर ते ऑटो डेबिटला परवानगी देऊ शकतात आणि देय तारखेला त्यांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातील. त्यांच्याकडे त्यांची रक्कम आणि ऑटो डेबिट टाइमलाइन बदलण्याचा पर्याय देखील असेल. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांचे ऑटो डेबिट सुरु किंवा बंद करू शकतील. हेही वाचा: Chinese Loan Apps: ‘या’ चिनी अॅप्सनी घेतला अनेक भारतीयांचा बळी, सरकारनं उचललं कडक पाऊल व्हर्च्युअल खाते क्रमांक तयार करण्याची प्रक्रिया- पेन्शन योजनेत UPI द्वारे पैसे जोडण्यासाठी, तुम्हाला एक व्हर्च्युअल खाते क्रमांक तयार करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही UPI पेमेंट करू शकता. ज्यासाठी तुम्हाला सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी सिस्टमवरील eNPS वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी येथे तुम्हाला तुमचा तपशील द्यावा लागेल. यानंतर तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकावा लागेल. तुम्हाला Tier-1 किंवा Tier-2, ज्यासाठी व्हर्च्युअल खाते तयार करावे लागेल, तुम्ही त्यापैकी योग्य पर्याय निवडा आणि कन्सेंट किंवा संमती द्या. आता ‘जनरेट व्हर्च्युअल अकाउंट’ वर क्लिक करा आणि विनंती ट्रस्टी बँकेकडे पाठवा. तुमच्या विनंतीसाठी एक अकनॉलेजमेंट किंवा पोचपावती क्रमांक दिसेल. वेगवेगळ्या टीयरसाठी भिन्न नंबर तयार केले जातील. त्याच्या UPI हँडलमध्ये 15 अंकी व्हर्च्युअल खाते क्रमांक प्रविष्ट करा. नंतर निधी पाठवण्यासाठी PFRDA.15digitVirtualAccount@axisbank प्रविष्ट करा.
हा नियम लक्षात ठेवा- पेन्शन योजनेत UPI मधून तुमचे योगदान देण्यापूर्वी, तुम्हाला हा नियम माहित असणं आवश्यक आहे. PFRDAने म्हटलं आहे की या पेमेंट पद्धतीद्वारे सकाळी 9:30 पूर्वी केलेले योगदान त्याच दिवशी केलेली गुंतवणूक मानली जाईल. जर तुम्ही सकाळी 9:30 नंतर पेमेंट केलं नाही, तर त्या वेळेनंतर तुम्ही भरलेले पैसे पुढच्या दिवसामध्ये गणले जातील.