मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्यात खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

सोन्यात खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यावर अधिक भर दिला जात आहे

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यावर अधिक भर दिला जात आहे

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यावर अधिक भर दिला जात आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : मौल्यवान धातू असलेल्या सोन्याला भारताच्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात आणि लग्नसोहळ्यांसह इतर शुभप्रसंगी सोनंखरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. गेल्या कित्येक शतकांपासून चालत आलेली ही प्रथा आजतागायत सुरू आहे.

    सोन्याला लक्ष्मीदेवीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात भाग्य आणि संपत्तीचा वास राहतो, असं मानलं जातं. या शिवाय, सोनं ही अशी मौल्यवान वस्तू आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाऊ शकते.

    गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यावर अधिक भर दिला जात आहे. सध्या सोन्याच्या किमती 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहेत. या वर्षी, 19 सप्टेंबर 2022 पर्यंत सोन्यातून रुपयाच्या रुपात अधिक 2.7 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

    जर तुम्हीही सणासुदीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर येथे काही महत्त्वाचे घटक दिले आहेत. हे घटक सोन्यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्न्सवर परिणाम करू शकतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्यांची माहिती असणं गरजेचं आहे:

    1) वाढता भू-राजकीय तणाव: जगाच्या अनेक भागांमध्ये जिओपॉलिटिकल टेन्शन्स अर्थात भू-राजकीय तणाव वाढत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन सुमारे सात महिने झाले आहेत. ती परिस्थिती निवळण्याची चिन्हं तूर्तास तरी दिसत नाहीत. या दरम्यानच आता चीन आणि तैवानमध्ये नवीन तणाव निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारताचा चीनशी सीमा वाद सुरू आहे.

    Gold Price: सोनं आणखी स्वस्त होणार? ‘या’ दोन गोष्टींमुळं होणार ग्राहकांची चंगळ, वाचा तज्ज्ञांचं मत

    उत्तर कोरिया न्युक्लिअर अॅक्टिव्हिटी वाढवून आणि क्षेपणास्त्र चाचण्या करून अमेरिकेसारख्या बड्या शक्तीला चिथावणी देत आहे. या शिवाय, आखाती देशांतही लहान-मोठे प्रादेशिक संघर्ष सुरू आहेत. समाज, ध्येय-धोरणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर अशा अनिश्चित घडामोडींचे परिणाम होऊ शकतात. सोन्याशी संबंधित व्यवहारांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. आरबीआय, तसेच इतर मध्यवर्ती बँकांना सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम माहिती असूनही त्या सोनंखरेदी करत आहेत.

    2) वाढणारी महागाई: पुरवठा साखळीतील अडथळे आणि तेल व वस्तूंच्या किमतींची यू.एस. डॉलरमधील वाढ (आयात चलनवाढीस कारणीभूत), अनियमित देशांतर्गत मान्सून आणि अशा स्वरूपातील भू-राजकीय धक्क्यांमुळे चलनवाढीचा धोका निर्माण होतो. 2022 मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या राहण्याचा खर्चामध्ये म्हणजेच महागाईमध्ये वाढ होत राहण्याची शक्यता आहे.

    उच्च महागाईचा सोन्यावर काय परिणाम होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, सामान्यतः सहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाईच्या काळात, सोन्याची कामगिरी उंचावते. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर उच्च चलनवाढीच्या परिणामांचा सामना करण्यास मदत होते. असं असलं तरी सोन्यातील गुंतवणुकीनं भूतकाळात केलेल्या कामगिरीमध्ये भविष्यात सातत्य राहिलच याची शाश्वती नाही.

    सोन्यातले स्वस्त पर्याय; बायको आणि बहिणीला करा खुश, पाहा PHOTO

    3) जागतिक मंदीची शक्यता: जगभरातील केंद्रीय बँकांनी गेल्या पाच दशकांमध्ये न पाहिलेल्या सिंक्रोनिसिटीसह या वर्षी दर वाढवले आहेत. त्यामुळे, 2023 मध्ये जगाला मंदीचा सामना करावा लागेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

    या अंदाजानुसार उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना आर्थिक किंवा कर्जाच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. असं घडलं तर सोन्यातील गुंतवणुकीत फायदा मिळू शकतो.

    जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Council) अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, सोनं ही सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या मालमत्तेपैकी एक असल्याचे सिद्ध झालं आहे. विशेषत: यूएसमधील मंदीच्या काळात आणि जेव्हा उच्च चलनवाढीचा सामना करावा लागतो तेव्हा सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरते. असं असलं तरी सोन्यातील गुंतवणुकीनं भूतकाळात केलेल्या कामगिरीमध्ये भविष्यात सातत्य राहिलंच याची खात्री देता येणार नाही.

    4) शेअर बाजारातील अस्थिरता तीव्र झाल्यास: भविष्यात, वर उल्लेख केलेल्या घटकांमुळे शेअर बाजारात तीव्र अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात, सोनं हे प्रभावी पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर असल्याचं दिसतं. एसीई एमएफनंच्या 19 सप्टेंबर 2022पर्यंतच्या डेटानुसार, ज्या काळात इक्विटीने गुंतवणूकदारांची निराशा केली त्या काळात सोन्याचा पोर्टफोलिओ कसा फायद्याचा ठरला आहे, हे अधोरेखित झालं आहे. असं असलं तरी सोन्यातील गुंतवणुकीनं भूतकाळात केलेल्या कामगिरीमध्ये भविष्यात सातत्य राहिलंच याची खात्री देता येणार नाही.

    ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, 19 सप्टेंबर 2022 पर्यंत सोन्यातून वार्षिक 8.8 टक्के चक्रवाढ परतावा मिळाला आहे. एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे 20 टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये करणं योग्य ठरू शकतं. सोन्यामधील 20 टक्के (दीर्घकालीन दृष्टिकोनासह) गुंतवणूक तुम्हाला आर्थिक बाजारातील चढ-उतारांच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करू शकते.

    जेव्हा तुम्ही सणासुदीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करता तेव्हा गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड यांसारख्या स्मार्ट गुंतवणूकीच्या मार्गांचा विचार करा. यामुळे तुम्हाला शुद्धता, प्राईज एफिशिअन्सी आणि लिक्विडीटीची खात्री मिळू शकते.

    First published:
    top videos

      Tags: Gold, Gold and silver, Gold bond