मुंबई, 8 फेब्रुवारी : अदानी विल्मरचा शेअर (Adani Wilmar Share) NSE वर 227 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला, जो त्याच्या 230 रुपयांच्या वरच्या किंमत बँडपेक्षा 3 रुपये कमी आहे. मात्र अल्पावधीत, अदानी विल्मारचा स्टॉक मजबूत झाला आणि तो इंट्राडेमध्ये NSE वर 249 रुपयांच्या पातळीवर गेला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार 300-320 रुपयांच्या टार्गेट किमतीसाठी स्टॉक होल्ड करु शकतात, तर अल्प-मुदतीसाठी गुंतवणूकदार सुमारे 280 रुपये नफा मिळवू शकतात. बाजारातील कमकुवत सेंटिमेंट्सचा परिणाम लाइव्हमिंटच्या अहवालात, स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले की, सामान्य लिस्टिंगचे कारण कमकुवत बाजारातील सेंटिमेंट आहे. या आयपीओची फंडामेंटल आणि वॅल्युएशन चांगले आहे. लिस्टिंग गेनसाठी अर्ज करणारे ते 200 च्या स्टॉप लॉससह होल्ड करु शकतात, तर दीर्घकालीन गुंतवणूकदार आणखी थांबू शकतात. नवीन गुंतवणूकदार सुरुवातीच्या कमजोरीला खरेदीची संधी म्हणून घेऊ शकतात. Petrol Prices Today: 7 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर क्रूड ऑइलचा दर, पाहा पेट्रोल-डिझेल दरावर काय परिणाम दीर्घकाळासाठी होल्ड करु शकतात मारवाडी शेअर अँड फायनान्स लिमिटेडचे अखिल राठी म्हणाले की, उत्कृष्ट प्रोडक्ट मिक्स, ब्रँड नाव, मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आणि आर्थिक कामगिरी यांच्या आधारे अदानी विल्मर तिच्या क्षेत्रातील अपेक्षित वाढीचा लाभ घेण्यास सक्षम आहे. याशिवाय, नवीन वॅल्यू अॅडेड प्रोडक्ट्स आणि स्ट्रॅटजिक एक्विजिशन लाँच करून आपला ग्राहक आधार वाढवण्याची कंपनीची योजना आहे. ब्रँडेड खाद्यतेल विभागात कंपनीचा 18 टक्के बाजारहिस्सा असून त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकचे मूल्यांकन वाजवी आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, दीर्घकालीन गुंतवणूकदार ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करू शकतात. कर बचतीची सुवर्णसंधी! आयकराच्या ‘या’ नियमानुसार 1.50 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वाचवू शकता Tax गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला 27 ते 31 जानेवारी दरम्यान तीन दिवस उघडलेल्या अदानी विल्मरच्या IPO ला 17.37 पट बोली मिळाली. IPO ला सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, जरी त्या काळात बाजारातील अस्थिरतेचा थोडासा परिणाम झाला. IPO साठी सर्वाधिक बोली लावणारे बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) च्या श्रेणीतून आले होते, ज्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्यापेक्षा 56.30 पट जास्त बोली लावली होती. शेअरहोल्डर्स कोटा दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याला 33.33 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले. अदानी विल्मरची स्थापना 1999 मध्ये झाली होती. हा अदानी समूह आणि सिंगापूरचा विल्मर यांचा संयुक्त उपक्रम आहे. ते फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत तेल आणि इतर खाद्यपदार्थ विकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.