मुंबई, 4 मे : भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले पडझड आज थांबू शकते. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदार (Share Market Investors) आज खरेदी करताना दिसू शकतात. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे काल सेन्सेक्स (Sensex) 85 अंकांनी घसरून 56,976 वर बंद झाला. निफ्टीही (Nifty) 33 अंकांनी घसरून 17,069 वर आला. आज बाजारात वाढ झाली तर सेन्सेक्स पुन्हा 57 हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आज जागतिक बाजारातही तेजीचा कल आहे, ज्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित होतील आणि ते सुरुवातीपासूनच खरेदी करू शकतील. हे घटक आजच्या व्यवसायात मोठी भूमिका बजावू शकतात. यूएस आणि युरोपियन बाजार यूएसमध्ये, फेड रिझर्व्ह 22 वर्षांतील सर्वात मोठी व्याजदर वाढ करणार आहे. तत्पूर्वी गुंतवणूकदार सावध दिसत आहेत, मात्र व्याज वाढल्याने महागाई नियंत्रणात येण्याची अपेक्षा असल्याने बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले आहेत. यामुळेच अमेरिकेतील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज नॅस्डॅकने गेल्या ट्रेडिंग सत्रात 0.22 टक्क्यांची उसळी दाखवली होती.
Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी चैक करा किमती
युरोपीय बाजारांमध्येही तेजीचे वातावरण होते आणि सर्व प्रमुख एक्सचेंज नफ्यावर बंद झाले होते. जर्मनीच्या शेअर बाजाराने 0.72 टक्के आणि फ्रान्सच्या शेअर बाजारात 0.79 टक्क्यांची उसळी घेतली आहे. याशिवाय लंडन स्टॉक एक्सचेंजही 0.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. आशियाई बाजारात संमिश्र कल आशियातील बहुतांश बाजारात आज सकाळच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून आला. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.63 टक्क्यांनी वधारत होते, तर तैवान 0.52 टक्क्यांनी व कॉस्पी 0.05 टक्क्यांनी वधारत होते. मात्र, आज सकाळच्या व्यवहारात हाँगकाँग शेअर बाजारात 0.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारातून माघार घेणे सुरूच ठेवले आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही FII ने 1,853.46 कोटी रुपये काढले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी त्यांच्या खरेदीद्वारे हा तोटा भरून काढला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2 मे रोजी 1,951.10 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. त्यामुळे बाजार मोठ्या पडझडीपासून वाचला.