Home /News /money /

Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी चैक करा किमती

Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी चैक करा किमती

डीलर्सचे म्हणणे आहे की जर क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर गेली तर कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात. सध्या जवळपास महिनाभरापासून त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

    मुंबई, 4 मे : सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले असून जवळपास महिनाभरात त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डीलर्सचे म्हणणे आहे की जर क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर गेली तर कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात. सध्या जवळपास महिनाभरापासून त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर >> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर >> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या 'हे' उपाय करा पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या