Home /News /money /

New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार

New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

येत्या काही दिवसात शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे. कारण 9 कंपन्या त्यांचे आयपीओ बाजारात आणणार आहेत.

    मुंबई, 3 मे : सेबीकडून (SEBI) परवानगी मिळाल्यानंतर आता आणखी 9 कंपन्या त्यांचा IPO बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्या डेलिव्हरी (Delhivery), फॅब इंडिया (Fab India), कॅपिलरी टेक्नॉलॉजीज (Capillary Technologies), हर्षा इंजिनिअरिंग (Harsha Engineering), इन्फिनॉन बायोफार्मा (Infinon Biopharma), अथर इंडस्ट्रीज (Athar Industries), सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी (Sirma SGS Technology), एशियानेट सॅटेलाइट कम्युनिकेशन (Asianet Satellite Communications) आणि सनातन टेक्सटाइल्स (Sanatan Textiles) आहेत. आयनॉक्स ग्रीन या कंपनीने आयपीओसाठी दाखल केलेली सुरुवातीची कागदपत्रे मागे घेतली आहेत. आता ही कंपनी सध्या IPO आणणार नाही. डेलिव्हरी या कंपनीचा IPO 11 मे रोजी ओपन होईल आणि 13 मे पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ही एक लॉजिस्टिक कंपनी आहे जी IPO द्वारे 5,235 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. यापूर्वी कंपनीची इश्यू साईज 7,460 कोटी रुपये होती, जी नंतर कमी करण्यात आली आहे. यामध्ये 4,000 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू आहेत. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरली जाईल. फॅब इंडिया ही भारतातील अग्रगण्य पारंपारिक ड्रेस उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने या वर्षी जानेवारीमध्ये सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. कंपनी 500 कोटी रुपयांचा नवीन इश्यू जारी करेल आणि 2.5 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे येतील. आयपीओपूर्वी 100 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या 'हे' उपाय करा कॅपिलरी टेक्नॉलॉजीज हे एक आर्टिफिशिय इंटेलिजन्स बेस्ड क्लाउड-नेटिव्ह सॉफ्टवेअर-एज-ए-सोल्यूशन आहे. आयपीओद्वारे 850 कोटी रुपये उभारण्याचे त्याचे लक्ष्य आहे. यामध्ये, उर्वरित ऑफर फॉर सेल अंतर्गत 200 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू जारी केला जाईल. हर्ष इंजीनिअरिंग कंपनीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता. IPO च्या माध्यमातून 755 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. त्यात 455 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू आहेत. कंपनी ही रक्कम कर्ज फेडण्यासाठी, मशीन खरेदी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी वापरेल. सिरमा एसजीएस टेक्नोलॉजी ही एक तंत्रज्ञान आधारित डिझाइन कंपनी आहे ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये IPO साठी अर्ज केला होता. आयपीओद्वारे 1000-1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. यामध्ये 926 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू जारी केले जातील. PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे काय आहेत फायदे, पाहा तुमच्या फायद्याच्या या 7 गोष्टी अथर इंडस्ट्रीज कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आयपीओसाठी अर्ज केला होता. 757 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. ही रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी, प्रस्तावित ग्रीनफिल्ड प्रकल्प आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरेल. एशियानेट सॅटेलाइट कम्युनिकेशन ही इंटरनेट सेवा प्रोव्हायडर कंपनी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्यांनी आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. 765 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. त्याचे प्रमोटर हॅथवे इन्व्हेस्टमेंट्स ऑफर फॉर सेल अंतर्गत 465 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहेत. ही रक्कम कर्जाची परतफेड आणि नेटवर्क विस्तारण्यासाठी वापरली जाईल. सनातन टेक्सटाइल्स कंपनीने जानेवारीमध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता आणि याद्वारे 1,000-1,200 कोटी रुपये उभारण्याचा विचार आहे. यामध्ये 500 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू येणार आहे. इन्फिनोन बायोफार्मा कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेबीकडे प्रायमरी कागदपत्रे सादर केली होती. ते 45 लाख फ्रेश शेअर्स जारी करेल. मोबियस बायोकेमिकल्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि महिलांच्या स्किनकेअर आणि आरोग्य उत्पादने तयार करण्यासाठी परवाने मिळवण्यासाठी पैसे वापरले जातील.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या