मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेअर बाजारात तेजीनंतर सलग दुसऱ्या दिवशी घसरण; का सुरु आहे प्रॉफिट बुकिंग?

शेअर बाजारात तेजीनंतर सलग दुसऱ्या दिवशी घसरण; का सुरु आहे प्रॉफिट बुकिंग?

गेल्या काही महिन्यातील अपट्रेंडमुळे शेअर बाजार सध्या खूप वरच्या स्तरावर आहे, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी देखील मोठी संधी गुंतवणूकदारांना आहे.

गेल्या काही महिन्यातील अपट्रेंडमुळे शेअर बाजार सध्या खूप वरच्या स्तरावर आहे, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी देखील मोठी संधी गुंतवणूकदारांना आहे.

गेल्या काही महिन्यातील अपट्रेंडमुळे शेअर बाजार सध्या खूप वरच्या स्तरावर आहे, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी देखील मोठी संधी गुंतवणूकदारांना आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर : मागील आठवडाभरातील अपट्रेंडनंतर आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजार बंद झाला त्यावेळी सेन्सेक्स 456.09 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी खाली 61259.96 वर बंद झाला. तर निफ्टी 152.15 अंक म्हणजेट 0.83 टक्क्यांनी खाली 18,266.60 वर बंद झाली. गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे BSE सेन्सेक्स बुधवारी लाल रंगावर बंद झाला.

गेल्या काही महिन्यातील अपट्रेंडमुळे शेअर बाजार सध्या खूप वरच्या स्तरावर आहे, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी देखील मोठी संधी गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळेच ही संधी गुंतवणूकदार सोडत नाहीयेत. इंडेक्समध्ये मजबूत शेअर्स असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Relience Industries), इन्फोसिस (Infosys) आणि आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) शेअर्समध्ये पडझड झाल्याने बाजार लाल रंगात राहिला. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये टायटन तीन टक्क्यांनी घसरुन सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. याशिवाय, एचयूएल (HUL), एनटीपीसी (NTPC), बजाज फिनसर्व (Bajaj Finserv Ltd.), एल अँड टी (L&T) आणि पॉवरग्रीड (Powergrid) या शेअरमध्ये मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, प्रॉफिटमध्ये भारती एअरटेल (Bharti Airtel), एसबीआय (SBI), इंडसइंड बँक (Indusind Bank), बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) यांचा समावेश आहे.

IRCTC च्या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशीही 18 टक्क्यांनी घसरण

द इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस रंगनाथन म्हणाले की, ज्या स्टॉकमध्ये पडझड झाली ते न्याय्य आहेत. कारण किंमत खूप वाढली आहे. ते म्हणाले की जवळजवळ सर्व सेक्टरनुसार इंडेक्स तोट्यात आहेत. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँका तेजीत राहिल्या. गुंतवणूकदारांनी या विभागात गुंतवणूक करताना पाहिले पाहिजे.

ऐन सणासुदीला भाजीपाल्याबरोबर कांदाही रडवणार! महिन्याभरात दुप्पट झाले भाव

इतर आशियाई बाजारांमध्ये, हाँगकाँगचे हँगसेंग, जपानचे निक्केई, तर चीनचे शांघाय कंपोजिट आणि दक्षिण कोरियाचे कोस्पी घसरले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारपेठा दुपारच्या व्यापारात संमिश्र होत्या. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.82 टक्क्यांनी घसरून 84.38 डॉलर प्रति बॅरलवर आले.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market, Stock Markets