जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शेअर बाजाराची किमया! कर्जात बुडालीय कंपनी; पण 2 वर्षांत शेअर्स 12,800 टक्क्यांनी वाढले

शेअर बाजाराची किमया! कर्जात बुडालीय कंपनी; पण 2 वर्षांत शेअर्स 12,800 टक्क्यांनी वाढले

शेअर बाजाराची किमया! कर्जात बुडालीय कंपनी; पण 2 वर्षांत शेअर्स 12,800 टक्क्यांनी वाढले

हा शेअर गेल्या अनेक वर्षांपासून लॉसमध्येच (Loss) होता. कंपनी वर्षांनुवर्षे आपल्या रिपोर्टमध्ये लॉसच दाखवत आहे. तरीही शेअर्सचा भाव चढा राहिला

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जानेवारी – टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र (Tata Teleservices Maharashtra) या कंपनीचा स्टॉक गेल्या एका वर्षात 3,000 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत तो 12,800 टक्क्यांनी वाढला आहे. तुम्ही विचार करत असाल की, खूपच जबरदस्त शेअर असेल हा. परंतु हा शेअर गेल्या अनेक वर्षांपासून लॉसमध्येच (Loss) होता. कंपनी वर्षांनुवर्षे आपल्या रिपोर्टमध्ये लॉसच दाखवत आहे. शेअर बाजाराचे एक्सपर्ट सांगतात, की अशा प्रकारच्या शेअरपासून तुम्ही दूर राहिलेलेच बरे! टाटा ग्रुपच्या या शेअरने (TTML) 2.25 रुपयांपासून सुरू होऊन 290.15 रुपयांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 24 डिसेंबरनंतर 11 जानेवारीपर्यंत या शेअरने सातत्यानं 5 टक्क्यांचा अपर सर्किट दिला आहे. बुधवारी (12 जानेवारी) या शेअरवर लो सर्किट लागला आणि तो 5 टक्क्यांनी घसरून 275.65 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी (11 जानेवारी) तो 290.15 रुपयांवर बंद झाला होता.

Share Market Investment: 1 रुपयाच्या या शेअरने वर्षभरात दिला 7,000% चा रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक

टाटाच्या इतर कंपन्यांपेक्षा बाजार भांडवलीकरण जास्त सातत्याने 13 अपर सर्किट दिल्यानंतर या शेअरचे बाजार भांडवलीकरण 56,898 कोटी रुपये झाले आहे. तोट्यात चाललेल्या कंपनीचा मार्केट कॅप टाटा कम्युनिकेशन्स, वोल्टास, ट्रेन्ट, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा एलेक्सी या टाटाच्या इतर कंपन्यांपेक्षाही जास्त झाला आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या एका बातमीनुसार, स्वतंत्र विश्लेषक अंबरीश बालिगा म्हणाले, सतत गेली काही वर्षे एक कंपनी शुद्ध तोटा नोंद करते आहे. व्याज फेडण्यासाठी कंपनीकडे महसूलही निर्माण केलेला नाही. तीच कंपनी विक्रीच्या 50 पटीने अधिक व्यवसाय करत आहे. ही एक विचित्र गोष्ट आहे. ते सांगतात, सोशल मीडियावर अनेक अफवांसह स्टॉक अनेक दिवसांपासून वरील सर्किटवर आहे आणि यावर कंपनी व्यवस्थानप आश्चर्यकारकरित्या गप्प आहे. हा आहे याचा इतिहास TTML ही कंपनी पूर्वी ह्युजेस टेलिकॉम (Hughes Telecom) या नावाने ओळखली जात होती. टाटा टेलिसर्व्हिसेस ही एक सहाय्यक कंपनी आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात सेवा देण्यासाठी या कंपनीला लायसन्स मिळाले होते. कधी काळी कंपनी सेवा प्रदान करत होती. TTML मध्ये टाटा टेलीची 48.30 टक्के भागिदारी आहे. तर टाटा सन्स आणि टाटा पावर या कंपनीत 19.58 टक्के आणि 6.48 टक्के भागिदारी आहे. कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. 2008 पासून ती मंदीतून जात आहे. जापानच्या NTT DoCoMo या मोठ्या टेल्को कंपनीने 2018 मध्ये आपला पूर्ण स्टेक (26.5 टक्के) विक्री केला होता. नंतर 2019 मध्ये टाटा टेलीने आपले ग्राहक मोबाईल व्यवसाय, आपली मालमत्ता, स्पेक्ट्रम आणि दायित्व एअरटेल कंपनीला विक्री केले होते.

मोठी मागणी असणाऱ्या या प्रोडक्टचा करा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

कर्जाचे व्याज जास्त, उलाढाल कमी TTML चे फंडामेंटल्सचा महसूल सतत घसरत असल्याचा तसेच तोटा वाढण्याचा ट्रेंड सुरू आहे. कंपनीने 2021 या आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा लॉस दाखवला. गेल्या दहा वर्षांबाबत बोलल्यास कंपनीचा 21,300 कोटी रुपयांचा लॉस झाला आहे. 2019 पासून कंपनीतर्फे परतफेड करण्यात येत असलेले कर्जाचे व्याज हे तिच्या उलाढालीपेक्षा जास्त आहे. कंपनीने गेल्या एका वर्षात आपला तोटा कमी केला आहे. परंतु सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीचे कर्ज वाढून 19,700 कोटी झाले आहे. 31 मार्च 2021 पर्यंत ते 17,774 कोटी रुपये होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात