Home /News /money /

मोठी मागणी असणाऱ्या या प्रोडक्टचा करा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

मोठी मागणी असणाऱ्या या प्रोडक्टचा करा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई

रोजच्या नाश्त्यामधील एका पदार्थाच्या संबंधित हा व्यवसाय आहे. तो पदार्थ म्हणजे पोहे. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. हे तयार करायला आणि पचायला दोन्ही सोपे असतात. पोह्यांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे Poha manufacturing कडे तुम्ही एक व्यवसाय म्हणून पाहू शकता

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 12 जानेवारी: तुम्ही एखादा व्यवसाय सुरू (starting own business) करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाची माहिती देणार आहोत, जो तुम्हाला कमी गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात नफा (Earn money) मिळवून देऊ शकतो. रोजच्या नाश्त्यामधील एका पदार्थाच्या संबंधित हा व्यवसाय आहे. तो पदार्थ म्हणजे पोहे. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. हे तयार करायला आणि पचायला दोन्ही सोपे असतात. पोहे मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असून त्याची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कच्चे पोहे बनवण्याचा व्यवसाय (Poha manufacturing) तुम्हाला चांगलाच नफा (profitable business) मिळवून देऊ शकतो. खादी ग्रामोद्योग मंडळाने (Khadi Village Industries Commission) तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार पोहे बनवण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 2.43 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. या व्यवसायासाठी सरकार तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देतं. याचाच अर्थ तुमच्याकडे फक्त 25 हजार रुपये असतील तरीही तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल. हा व्यवसाय कसा सुरू (How to start own business) करता येईल आणि त्याचा काय फायदा होईल ते जाणून घेऊयात. हे वाचा-सोन्यामध्ये घसरण तर चांदीची झळाळीही उतरली, काय आहे लेटेस्ट दर खर्च किती येईल ? केव्हीआयसीच्या (KVIC) रिपोर्टनुसार सुमारे 2.43 लाख रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी मोठ्या जागेची गरज नाही. केवळ 500 स्क्वेअर फूट जागेमध्ये हे युनिट बसवता येतं. या युनिटसाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. पोहे बनवण्याचं मशीन, चाळणी, भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम अशा गोष्टींसाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. याशिवाय सुमारे 43 हजार रुपयांचं खेळतं भांडवल लागतं. लाखो रुपयांची कमाई या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला कच्चा माल खरेदी करावा लागेल. यासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च करावे लागतील. तसेच इतर खर्च 50 हजार रुपये येईल. हा कच्चा माल वापरून तुम्ही सुमारे 1 हजार क्विंटल पोहे तयार करू शकाल. याचा एकूण निर्मितीखर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन आता 8.60 लाख रुपये होईल. अर्थात यामध्ये कच्चा माल आणि प्रकल्पासाठी आलेला खर्च गृहीत धरण्यात आला आहे. 1 हजार क्विंटल पोहे विकल्यास सुमारे 10 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. म्हणजेच, यातून तुम्हाला सुमारे 1.40 लाख रुपये नफा होऊ शकतो. हे वाचा-आता WhatsApp वरुन खरेदी करता येईल Insurance Policy, ही कंपनी देतेय खास सुविधा असं मिळवा कर्ज केव्हीआयसी रिपोर्टमधील माहितीनुसार,तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून, ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केल्यास, तुम्हाला जवळपास 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. केव्हीआयसी दर वर्षी ग्रामोद्योगांना (Village Industry) चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देते. या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता. कोरोनाचा मोठा फटका इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक क्षेत्राला बसलाय. अनेकांच्या नोकऱ्या याकाळात गेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन नोकरी मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतोय. अशावेळी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करून तुम्ही लाखो रुपये नफा कमवू शकता.
First published:

Tags: Business, Business News

पुढील बातम्या