मुंबई, 12 जानेवारी: अगदी कमी किंमतीचे शेअर्स, ज्यांना आपण पेनी स्टॉक्स (Penny Stocks) म्हणतो हे बऱ्याच वेळा मल्टिबॅगरही (Multibagger stocks) ठरतात. मात्र, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे काम असते. कारण, ज्याप्रमाणे पेनी स्टॉक मल्टिबॅगर (Penny Stock turned Multibagger) ठरू शकतात, त्याचप्रमाणे ते बुडूही शकतात. आज आपण असा एक स्टॉक पाहणार आहोत, ज्याने केवळ वर्षभरातच गुंतवणुकदारांना तब्बल सात हजार टक्के (Penny stock gave 7000% return) रिटर्न दिला. मात्र, हा स्टॉक आता खाली घसरत चालला आहे. सिमप्लेक्स पेपर्स (Simplex Papers) असं या शेअरचं नाव आहे. या शेअरची किंमत गेल्या वर्षी अवघा एक रुपया होती, ती आता वाढून 71.30 रुपये (Simplex Papers share price) झाली आहे. अर्थात, गेल्या आठवडाभरापासून हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री सुरू झाल्यामुळे याची किंमत 14 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या महिन्यात हा स्टॉक आपल्या सर्वोच्च किंमतीला (122.70 रुपये) पोहोचला होता. मात्र, त्यानंतर तो सातत्याने खाली येत आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरने केवळ 2.50 टक्के रिटर्न (Simplex Papers return) दिला आहे. हे वाचा- Sri Lanka: चीनच्या कर्जामुळे मोडलं अर्थव्यवस्थेचं कंबरडं, चहा पिणंही न परवडणारं झपाट्याने वाढली होती शेअर प्राईज गेल्या वर्षी अवघ्या एक रुपयांचा असलेला हा शेअर, सहा महिन्यांमध्येच 4.41 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्येच तो तब्बल 71.30 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 7000 टक्के परतावा (Simplex papers total returns) दिला आहे. पाहूया आकड्यांचे गणित सिम्पलेक्स पेपर्सची शेअर प्राईज हिस्ट्री (Simplex Papers share price history) पाहता, जर गुंतवणूकदारांनी एक आठवड्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती; तर त्या एक लाख रुपयांचे आज 86 हजार झाले असते. त्याचप्रमाणे, जर कोणी एक महिन्यापूर्वी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे सध्या त्याला केवळ 1.02 लाख रुपये मिळाले असते. हे वाचा- सोन्यामध्ये घसरण तर चांदीची झळाळीही उतरली, काय आहे लेटेस्ट दर जर कोणी सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे आज 16 लाख रुपये झाले असते. तसेच, जर कोणी एका वर्षापूर्वी सिम्पलेक्स पेपर्सचे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असते, तर आज त्या व्यक्तीला 71 लाख (1 Lakh turned to 71 lakh) रुपये मिळाले असते. एकूणच, एक वर्षापूर्वी सिम्पलेक्स पेपर्समध्ये काही लाख गुंतवणारा व्यक्ती आज कोट्यधीश झाला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.