मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सावधान! हॅकर्सने शोधून काढला नवा फंडा, तुमची फक्त एक चूक पडू शकते महागात

सावधान! हॅकर्सने शोधून काढला नवा फंडा, तुमची फक्त एक चूक पडू शकते महागात

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. 2019 मध्य़े या प्रकरणाच्या एकूण 515 तक्रारी नोंद केल्याचं समोर आलं आहे.

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. 2019 मध्य़े या प्रकरणाच्या एकूण 515 तक्रारी नोंद केल्याचं समोर आलं आहे.

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. 2019 मध्य़े या प्रकरणाच्या एकूण 515 तक्रारी नोंद केल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 26 जानेवारी: सायबर क्राइमचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विविध मार्गानं हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचून फसवणूक करत असल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. फोनवरून अथवा SMS वरून हॅक करण्याची पद्धत आता मागे पडली असून हॅकर्सनी आता आणखी एक नवा फंडा शोधून काढला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर हॅकर थेट तुमच्या मोबाईलमधील तपशील काढू शकतो. हॅकर्स 'की-लॉगर' सॉफ्टवेअरद्वारे लोकांचे मोबाइल लॉक अनलॉक करत आहेत. लॉक उघडल्यानंतर त्याच्या कीपॅडवरील प्रत्येक गतिविधीबद्दल माहिती प्राप्त केली जात आहे. याद्वारे ते आपल्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, अगदी नेट बँकिंग आणि एटीएम कार्ड इत्यादी माहिती देखील मिळवू शकतात. त्यासाठी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तुम्हाला जर पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्याची सवय असेल तर तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अगदी सहज ओढले जाऊ शकता. याचं कारण म्हणजे की-लॉगर सॉफ्टवेअर फक्त हिचिंगच्या संगणकावर सुरू होतं. त्याद्वारे मोबाईलवर सेव्ह केलेले पासवर्ड, अकाउंट्स आणि वैयक्तिक चित्रे आणि व्हिडिओ हॅक करण्यासाठीही हॅकर्स याचा वापर करतात. असं पोलिसांना एका तपासातून समोर आलं होतं. याचा वापर आता मोठ्या प्रमाणात हॅकर्स करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. 2019 मध्य़े या प्रकरणाच्या एकूण 515 तक्रारी नोंद केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा-त्रास देते म्हणून मुलानेच दिली आईची सुपारी, मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार मोबाईल बँकिंग, एटीएम आणि सोशल मीडिया खात्यांमधून हॅकर्स पासवर्डची माहिती घेतात. याच कारणास्तव एटीएम कार्ड नसतानाही खातेदाराच्या बँक खात्यातून पैसे काढणे, ऑनलाइन शॉपिंगपासून सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे आणि पैसे मागण्यापर्यंतच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही मोबाईलवरून वेगवेगळे सॉफ्टवेअर डाऊनलोड करता. अथवा सोशल मीडियावर फिरत्या संकेतस्थळाचा लिंकवर भेट देता. अशावेळी तुमची माहिती लिक होण्याचा धोका असतो. त्यासाठी आवश्यक ते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर फोनमध्ये ठेवावं. याशिवाय तुमचे पासवर्ड सतत बदलत राहिल्यामुळे हॅक करणं कठीण जातं. कोणताही पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करू नये. आपलं अकाउंट काम झालं की लॉग आऊट करायला विसरू नका त्यामुळे हा धोका टळू शकतो. असं आवाहन सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडून कऱण्यात आलं आहे. हेही वाचा-गुगलवरून नंबर घेऊन बैलासाठी मागितली मदत आणि...
First published:

Tags: Crime news, Cyber crime, Whatsapp hacking

पुढील बातम्या