मुंबई, 05 फेब्रुवारी : एखादा रस्ता पूर्ण रिकामा आहे. त्यावरून एकटाच माणूस चालतोय आणि तेव्हा तुम्हाला गुगल मॅपने त्या रस्त्यावर ट्राफिक जॅम आहे असं सांगितलं तर तुम्ही नक्कीच गुगल मॅपला वेड्यात काढाल. जर्मनीतील एका माणसाने गुगलला असंच उल्लू बनवलं आहे. सायमन वेकर्ट असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करून दाखवलं की बर्लिनमधील रस्त्यांवर व्हर्च्युअल ट्राफिक जॅम करण्यासाठी 99 स्मार्टफोनचा वापर करून गूगल मॅप हॅक केला. वेकर्टने गूगल मॅप ऑन करून 99 स्मार्टफोन एका लहान तयार केलेल्या गाडीत घातले आणि ती गाडी घेऊन तो बर्लिनमधील वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरला.
गूगल मॅपने या 99 स्मार्टफोनच्या लोकेशनला ट्रॅक करत पूर्ण रस्त्यावर ट्राफिक जॅम असल्याचे नोटिफिकेशन देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे रस्त्यावर एकही गाडी नव्हती. वेकर्ट त्याच्यासोबत 99 स्मार्टफोन घेऊन चालत होता आणि गुगल मॅपने हळू हळू जाणाऱ्या गाड्या समजून ट्राफिक जॅमचा सिग्नल दिला.
वेकर्ट ज्या ज्या ठिकाणी गेला तिथं गुगल मॅपने ट्राफिक जॅमचे नोटिफिकेशन दाखवायला सुरुवात केली. यात हिरवा असलेला रस्ता लाल रंगात दिसू लागला. ज्यावेळी ट्राफिक जास्त असतं तेव्हा मॅपवर लाल रंग दिसतो.
वाचा : तुमच्या व्हॉइस कमांडवर असते Google ची करडी नजर
गुगलने ट्राफिक जॅम दाखवायला सुरुवात केल्यानं अनेक चालकांनी त्या मार्गाने जाणं टाळलं. त्यामुळे रस्त्यावर एकही गाडी आली नाही. सायमन वेकर्टने केलेल्या प्रयोगावर गुगलने कमेंट केली आहे. गुगलच्या इंजिनिअरने म्हटलं की, गुगल मॅपसाठी मी काम करतो. मला याबद्दल माहिती आहे. ही यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते त्यानुसार असं घडू शकतं.
एकाच व्यक्तीकडे इतके फोन असणं शक्य नाही. पण याचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे गुगलकडून ही त्रुटी लवकर ठीक केली जावी अशी अपेक्षा वेकर्टने व्यक्त केली आहे.
लवकरच येणार महिंद्राची इलेक्ट्रिक SUV; Teaser पाहूनच कराल गाडी बुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.