मराठी बातम्या /बातम्या /मनी /स्टेट बँक की पोस्ट ऑफिस? कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त नफा?

स्टेट बँक की पोस्ट ऑफिस? कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त नफा?

गुंतवणूक करताना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मुदत ठेव योजना यांपैकी चांगला परतावा कुठे मिळेल, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

गुंतवणूक करताना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मुदत ठेव योजना यांपैकी चांगला परतावा कुठे मिळेल, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

गुंतवणूक करताना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मुदत ठेव योजना यांपैकी चांगला परतावा कुठे मिळेल, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

  मुंबई, 11 नोव्हेंबर : भविष्यातल्या खर्चाची तरतूद करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आर्थिक उत्पन्नानुसार गुंतवणूक (Investment options) करत असतो. आपली संपत्ती वाढावी यासाठी गुंतवणूक केली जाते. त्यासाठी बँक, पोस्ट ऑफिस, खासगी वित्तीय संस्था, शेअर बाजार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातले काही पर्याय जोखीमयुक्त आहेत, तर काही सुरक्षित आहेत. सर्वसामान्य लोक सुरक्षित आणि अधिक परतावा देणाऱ्या पर्यायाला अधिक प्राधान्य देतात. त्यामध्ये जोखीममुक्त गुंतवणुक पर्याय म्हणून पोस्टातली सरकारी (Post office Schemes) अल्पबचत योजना आणि बँकेतल्या मुदत ठेवी हे पर्याय अधिक पसंतीचे असतात. त्यातही पोस्टातल्या योजनांचे व्याजदर जास्त असतात. त्यामुळे सुरक्षितता आणि अधिक परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून पोस्टातल्या अल्पबचत योजनांना अधिक पसंती दिली जाते. अनेक बँकाही आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit)आणि रिकरिंग डिपॉझिट योजनांवर आकर्षक व्याजदर देतात. त्यात स्टेट बँक देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक असल्यानं अनेकांचं स्टेट बँकेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य असते.

  गुंतवणूक करताना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मुदत ठेव योजना यांपैकी चांगला परतावा कुठे मिळेल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही आता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक यामध्ये मुदत ठेवीवर किती व्याजदर दिला जात आहे हे लक्षात घेतलं, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सोपं जाईल. लाईव्ह हिंदुस्ताननं याबाबतची माहिती दिली आहे.

  PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर

  पोस्ट ऑफिस मुदत ठेवीचे व्याजदर :

  पोस्ट ऑफिसातील मुदत ठेव योजना बँकेतल्या मुदत ठेव योजनेसारख्याच असतात. कोणताही गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेमध्ये एक वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 1 ते 3 वर्ष मुदतीपर्यंतच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याजदर मिळत आहे. त्यापुढील 5 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.7 टक्के व्याजदरानं व्याज दिलं जात आहे.

  विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस?

  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर :

  स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतचा पर्याय देते. सध्या बॅंकेतर्फे 7 ते 45 दिवस मुदतीच्या योजनेसाठी 2.9 टक्के व्याजदर दिला जात आहे. 46 ते 179 दिवसांच्या मुदतीसाठी 3.9 टक्के, तर 180 ते 210 दिवसांसाठी 4.4 टक्के, 211 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक मात्र एक वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 4.4 टक्के व्याजदर आहे. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 5 टक्के व्याजदर आहे. 2 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 5.1 टक्के व्याजदर आहे. 3 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 5.3 टक्के व्याजदर आहे. 5 वर्षं ते 10 वर्षं मुदतीसाठी 5.4 टक्के व्याजदर आहे.

  या व्याजदरांमध्ये तुलना करून तुम्ही अधिक व्यादर लक्षात घेऊन अधिक लाभदायी गुंतवणूक पर्याय निवडू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Investment, Post office, SBI