मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर

PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund Organization EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund Organization EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund Organization EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: EPFO सब्सक्रायबर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund Organization EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींची लवकरच बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय निकाली लागण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला पीएफवर किती व्याज मिळेल याबाबचा निर्णय याच बैठकीत होणार आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. तर पेन्शनची कमीतकमी रक्कम वाढण्याबाबत निर्णय घेणे, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.

तुम्हाला यावर्षी पीएफवर किती दराने व्याज (Interest Rate on PF) मिळेल याबाबत मोठा निर्णय ईपीएफओच्या बैठकीत (EPFO Meeting on 16th November)  होणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की ईपीएफवरील जमा रकमेवर व्याज आहे तेच अर्थात 8.5 टक्केच कायम ठेवले जाऊ शकते. सध्याच्या व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

हे वाचा-विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस?

या मुद्द्यांवर देखील होणार चर्चा

मीडिया अहवालांच्या मते, केंद्रीय ट्रेड यूनियन्सनी कमीतकमी पेन्शन वाढवून 1000 वरुन 6000 रुपये करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी पेन्शनमध्ये वाढ करू शकतात, मात्र ही वाढ 3000 रुपयांपर्यतच असेल. ईपीएफओचे पैसे खासगी कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवण्याचा वादग्रस्त मुद्दा देखील या बैठकीत मांडला जाईल. याशिवाय 2021-22 साठी पेन्शन फंडचा व्याजदर काय असावा, यावर देखील निर्णय होऊ शकतो.

हे वाचा-पुढील आठवड्यात आहे कमाईची संधी, या IPOमध्ये किती रुपयांत कराल गुंतवणूक?

16 नोव्हेंबरला होणार बैठक

ही बैठक 16 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. CBT ची शेवटची बैठक मार्च महिन्यात श्रीनगरमध्ये झाली होती. सीबीटीने 2020-21 साठी सदस्यांच्या खात्यात ईपीएफमधील जमा ठेवीवर 8.5 टक्के दराने व्याज देण्याची शिफारस केली होती. अर्थ मंत्रालयाने अलीकडेच याला मंजुरी दिली होती.

First published:

Tags: Epfo news, PF Amount, Pf news, PF Withdrawal