मराठी बातम्या /बातम्या /मनी /विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस?

विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation India) नुसार, तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास तुम्ही NPCI च्या *99# सुविधेद्वारे UPI पेमेंट करू शकता.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation India) नुसार, तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास तुम्ही NPCI च्या *99# सुविधेद्वारे UPI पेमेंट करू शकता.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation India) नुसार, तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास तुम्ही NPCI च्या *99# सुविधेद्वारे UPI पेमेंट करू शकता.

मुंबई, 10 नोव्हेंबर : केंद्र सरकार सातत्याने डिजिटल पेमेंटला (Digital Payment) प्रोत्साहन देत आहे. कोरोना संकटाच्या काळात लोकांनी रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमध्ये (UPI Transaction) झपाट्याने वाढ झाली. मात्र, UPI व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. इंटरनेट उपलब्ध नसेल तर डिजिटल पेमेंट करणे कठीण होते. देशाच्या अनेक भागात अजूनही इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. जर तुम्ही देखील इंटरनेट नसल्यामुळे UPI पेमेंट (UPI payment without internet) करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करता येईल याबद्दल माहिती घेऊया.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation India) नुसार, तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास तुम्ही NPCI च्या *99# सुविधेद्वारे UPI पेमेंट करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही स्मार्टफोन तसेच बेसिक कीपॅड फोनद्वारे UPI पेमेंट देखील करू शकता.

14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर

NPCI ची *99# सुविधा काय आहे?

*99# NPCI ची सुविधा ही USSD आधारित मोबाईल बँकिंग सेवा आहे. ही सुविधा नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त BSNL आणि MTNL यूजर्ससाठी उपलब्ध होती. लक्षात ठेवा की *99# द्वारे UPI पेमेंटसाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याच फोन नंबरहून पेमेंट अॅपवर एकदा नोंदणी करणे देखील आवश्यक आहे.

खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम

NPCI सेवेद्वारे पैसे कसे पाठवायचे?

>> सर्वात आधी फोनचा डायल पॅडवर *99# टाइप करा आणि कॉल बटणावर टॅप करा.

>> आता तुम्ही नवीन मेनूवर पोहोचाल. यामध्ये तुम्हाला 7 पर्याय मिळतील.

>> यामध्ये Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN असे पर्याय दिसतील.

>> जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर नंबर 1 दाबून Send Money पर्याय निवडा.

>> यानंतर, तुम्ही फोन नंबर, UPI आयडी किंवा खाते क्रमांक आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.

>> त्यानंतर रक्कम लिहा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी 4 किंवा 6 अंकी UPI पिन एंटर करा आणि 'Send' वर टॅप करा.

First published:
top videos

    Tags: Digital services, Online payments, Upi