Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, सामान्यांना मोठा दिलासा

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, सामान्यांना मोठा दिलासा

Petrol and Diesel Price Today

Petrol and Diesel Price Today

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) किंमती जवळपास 15 पैशांनी कमी झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel) आज बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या  (Petrol-Diesel Price Today) किंमती जवळपास 15 पैशांनी कमी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. अनेक शहरात जरी पेट्रोलचे दर वाढले नसले तरी ते शंभरीपार आहेत, त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. आज झालेल्या घसरणीमुळे यामध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या मते, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे. आज दर 15 पैशांनी कमी झाले आहेत. मंगळवारी देखील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. याधीच्या आठवड्यात देखील दर केवळ 15 पैशांनी कमी झाले होते. अशाप्रकारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-e-SHRAM card: लगेच बनवा हे महत्त्वाचं कार्ड; 2 लाखांपर्यंत सुविधा मिळतील मोफत तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? >> दिल्ली पेट्रोल 101.34 रुपये आणि डिझेल 88.77 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.08 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लीटर हे वाचा-मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? LICमध्ये 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी? >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.65 रुपये आणि डिझेल 89.34 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.27 रुपये आणि डिझेल 97.91 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.77 रुपये आणि डिझेल 97.57 रुपये प्रति लीटर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut

    पुढील बातम्या