नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : भारतात आता सणासुदीचा सीजन सुरू झाला आहे. अशात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. रुपयाच्या मजबूतीमुळे भारतात बाजारात आज सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने वायदे भाव 47,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदी वायदे भाव (Silver Price) 0.33 टक्क्यांनी कमी होऊन 63,156 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.
मंगळवारी रुपया 29 पैसे मजबूतीसह अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जवळपास 12 आठवड्यांच्या उच्च स्तर 73 वर बंद झाला. भारतात सोने दरात 10.75 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के GST सामिल आहे. रुपया मजबूत झाल्याने मौल्यवान धातूची आयात स्वस्त झाली आहे. गुड रिटर्न वेबसाईटनुसार, सोने दरात आज 1200 रुपये प्रति 1 तोळा घसरण झाली आहे. सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.
सोन्याचा आजचा दर -
<< मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
<< दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
<< कोलकातामध्ये 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅम
<< चेन्नई 44,660 रुपये प्रति 10 ग्रॅम
<< उत्तर प्रदेशात 46,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
<< बंगळुरूमध्ये 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅम
3 सप्टेंबरपर्यंत स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी -
सरकारकडून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी आहे. 30 ऑगस्टपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम 2021-22 च्या सहाव्या सीरिजचीविक्री सुरू झाली आहे. यासाठी इश्यू प्राईज 4,732 रुपये प्रति ग्रॅम आहे. ही स्किम पाच दिवसांसाठी सुरू आहे.
अशी तपासा सोन्याची शुद्धता -
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
Missed Call द्वारे जाणून घ्या लेटेस्ट गोल्ड रेट -
सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.