RBI नंतर SBI देखील ग्राहकांना खूशखबर देण्याची शक्यता, लवकरच होऊ शकेल तुमचा EMI कमी

RBI नंतर SBI देखील ग्राहकांना खूशखबर देण्याची शक्यता, लवकरच होऊ शकेल तुमचा EMI कमी

आरबीआयच्या निर्णयानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया देखील कर्जावरील व्याजदरामध्ये 0.40 टक्के कपात करू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मे : देशातील सर्वात मोठी बँत असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India) ग्राहकांना दिलासा देऊ शकते. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. आतापर्यंत आरबीयने केलेल्या व्याजदरांच्या कपातीचा फायदा एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे आता देखील एसबीआय कर्जावरील व्याजदरामध्ये 0.40 टक्के कपात करू शकते. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्के कपात केल्यानंतर रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4 टक्क्यावर आला आहे. रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के करण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर कर्जावरील EMI चा भार काहीसा कमी झाला आहे.

एसबीआय चेअरमन रजनीश कुमार यांनी अशी माहिती दिली की, आरबीआयच्या या निर्णयामुळे इंडस्ट्री आणि बँकांना मोठी मदत मिळेल. कर्जावरील मोरेटोरियममुळे कॅश फ्लो देखील राहिल, असंही ते म्हणाले.

(हे वाचा-RBIच्या या निर्णयामुळे FD वर कमी फायदा मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर)

याआधी एसबीआयने 27 मार्च रोजी आरबीआयने जी व्याजदरात कपात केली होती, त्याचा लाभ ग्राहकांना दिला होता. SBI ने एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 75-75 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती.  SBI द्वारे करण्यात आलेल्या एमसीएलआर कपातीनंतर बँकचा एका वर्षाचा एमसीएलआर 7.75 टक्क्यावरून  7.40 टक्क्यांवर पोहोचला होता.

(हे वाचा- व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, RBI च्या 6 मोठ्या घोषणा)

लॉकडाऊननंतर तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सामान्यांना दिलासा देणाऱ्या विविध घोषणा करण्यात येत आहेत. याआधी 27 मार्च आणि 17 मार्च रोजी आरबीआयने मोठे निर्णय घेतले होते. EMI Moratorium हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात कपात करण्यासही सहमती मिळाल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

First published: May 22, 2020, 2:18 PM IST
Tags: EMISBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading