नवी दिल्ली, 14 एप्रिल : देशभरात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढते आहे. अशात जर तुम्ही कोरोनाग्रस्त आहात आणि त्यावरील उपचारासाठीच्या खर्चाबाबत काळजीत असाल, तर टेन्शन घेण्याची गरज नाही. देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) कोरोनाच्या खर्चासाठी एक स्किम आणली आहे, ज्याचा केवळ 156 रुपयांत फायदा घेता येऊ शकतो. बँकेच्या या योजनेचं नाव कोरोना रक्षक पॉलिसी असं आहे.
SBI कोरोना रक्षक पॉलिसी -
- SBI ची कोरोना रक्षक पॉलिसी एक आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
- भारतीय स्टेट बँकेची ही कोविड पॉलिसी कोणत्याही मेडिकल टेस्टशिवाय जारी केली जाते.
- येथे 100 टक्के कव्हर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
- कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष आहे.
- कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये कमीत कमी प्रीमियम 156 रुपये आणि अधिकाधिक 2230 रुपये इतका आहे.
- या पॉलिसीमध्ये 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवसांचा अवधी आहे.
- स्टेट बँकेच्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त 2 लाख 50 हजारांचा कव्हर मिळतो.
- या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी 022-27599908 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.
- तसंच https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak या अधिकृत लिंकवरुनही अधिक माहिती घेता येईल.
देशात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असताना, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढतं आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1.84 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1000 हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.