नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : देशातली सगळ्यात मोठी बँक 'बँक ऑफ इंडिया' या सणावाराला मोठी ऑफर घेऊन येणार आहे. SBIने ग्राहकांसाठी दिवाळीची ऑफर आणली आहे. एसबीआय आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक आणि सवलत देणार आहे. बँकेच्या या ऑफरअंतर्गत कपडे, जेवण, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, दागदागिने यावर उत्तम ऑफर आहे. या ऑफर दरम्यान सर्वाधिक खर्च करणारे जर तुम्ही ठरलात तर तुमच्यासाठी एसबीआय अनेक भेटवस्तू ठेवणार आहे. ही ऑफर 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत वैध असणार आहे.
प्रत्येक तासाला मिळणार धमाकेदार ऑफर्स...
एसबीआयने भारताच्या दिवाळी ऑफरमध्ये विविध बक्षिसे, साप्ताहिक बक्षिसं, दैनिक आणि दर तासाला बक्षिसांची ऑफर दिली आहे. दर तासाला मिळणाऱ्या बक्षिसांमध्ये 50 लोकांना पुमाकडून 1000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळेल. दैनंदिन बक्षिसात, 10 लोकांना दररोज 6,999 रुपयांचे वायरलेस हेडफोन जिंकण्याची संधी मिळेल. त्याच वेळी, साप्ताहिक बक्षिसामध्ये 20 लोक दर आठवड्यात Mi A3 स्मार्टफोन जिंकू शकतात, ज्याची किंमत 17,499 रुपये आहे.
इतर बातम्या - Love Marriage झाल्यानंतर बहिण पहिल्यांदा आली माहेरी, भावाने असा काढला काटा!
Make this festive season more exciting! Avail great deals* across your favourite brands with your SBI Credit Cards. Become the Top spender and stand a chance to win exciting gifts! Valid till 30th October 2019.
Know more:https://t.co/lzAFchlVBE #IndiaKaDiwaliOffer #makelifesimple pic.twitter.com/O3JAsGsDOV
— SBI Card (@SBICard_Connect) October 4, 2019
1 लाख रुपयांचं मेगा बक्षिस
ऑफर दरम्यान सर्वाधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीस बरीच बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. या कार्यक्रमांतर्गत 12 विजेत्यांना मेकमायट्रिपचे 1 लाख रुपये किमतीचे हॉलिडे व्हाउचर, शाओमीचा स्मार्टफोन, स्मार्ट उपकरणांसह अनेक भेटवस्तू मिळू शकतात. ईएमआय व्यवहारांवरही ही ऑफर वैध आहे. लक्षात ठेवा की ऑफर कोणाबरोबरही क्लब केल्या जाणार नाहीत.
इतर बातम्या - मनसे उमेदवाराचा बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार, शिवसेना शाखेत जाऊन घेतलं दर्शन
20 टक्क्यांपर्यंत सवलत आणि कॅशबॅक
या ऑफरमध्ये खरेदीवर 20 टक्के सूट आहे. त्याचबरोबर 6,000 रुपयांपर्यंतची कॅशबँकदेखील उपलब्ध आहे. सॅमसंग नोट 10 च्या खरेदीवर 6000 रुपयांचे कॅशबॅक उपलब्ध असेल. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत वैध आहे. याशिवाय क्रोमाकडून खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक आहे, उच्च उत्पादनांवर 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर आहे. स्विगीला फूड ऑर्डरवर 20 टक्के सूट मिळेल.
इतर बातम्या - जॅकलिनने पहिल्यांदा काढला पोटावर 'खास' Tattoo, पाहा व्हायरल व्हिडिओ!