मनसे उमेदवाराचा बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार, थेट शिवसेना शाखेत जाऊन घेतलं दर्शन

मनसे उमेदवाराचा बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार, थेट शिवसेना शाखेत जाऊन घेतलं दर्शन

मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चासुद्धा डोंबिवलीत सुरू झाली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 07 ऑक्टोबर : डोंबिवलीचे मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला नमस्कार करतानाचा मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मनसेचे नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधीपक्ष नेते प्रकाश भोईरसुद्धा सोबत होते.

मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुद्धा डोंबिवलीत सुरू झाली आहे. मंदार हळबे यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला नमस्कार केला. सोबत मनसेचे नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधीपक्ष नेते प्रकाश भोईरसुद्धा सोबत होते. हाच फोटो फेसबुकवर व्हायरल झाला.

एकप्रकारे मनसेकडून शिवसेनेच्या कार्यकत्यांना साद घातली चर्चा आहे. डोंबिवली भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध मंदार हलबे अशी लढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांना महत्व आलं आहे. निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर दोन ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टीपेला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.

इतर बातम्या - चार वर्षाच्या मुलीने खाण्यासाठी दिला नकार, आईने जीव जाईपर्यंत दिला मार!

ठाकरे Vs ठाकरे, पुण्यात एकाच वेळी धडाडणार दोन तोफा

राज ठाकरे यांची 9 ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणा लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतर बातम्या - सत्तेसाठी युती आणि युतीसाठी तडजोड? वाचा उद्धव ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात 9 ऑक्टोबरला पहिली सभा घेऊन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात सभा घेऊन राज्यभरात सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या लाव रे तो व्हिडिओची चांगलीच चर्चाही झाली होती. आताही विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्यांच्या सभेसाठी मनसेला मैदानच मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेसाठी प्रशासनाला विविध पर्याय सुचवण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत राज यांच्या सभेसाठी मैदान मिळू शकलेलं नाही.

First published: October 7, 2019, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading