SBI च्या ग्राहकांना दिलासा! आता कमी होणार तुमच्या कर्जावरील EMI

SBI च्या ग्राहकांना दिलासा! आता कमी होणार तुमच्या कर्जावरील EMI

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI State Bank of India) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI State Bank of India) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने छोट्या कालावधीसाठी एमसीएलआर (MCLR) दर 0.10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर SBI चे दर कमी होऊन 6.65 टक्क्यांवर पोहोचले आहेत. एसबीआयने असा दावा केला आहे की, त्याचे एमसीएलआर दर देशातील सर्वात कमी आहेत. हे नवीन दर 10 जुलैपासून लागू होणार आहेत. जूनमध्ये देखील SBI ने व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने 22 मे रोडी रेपो रेट (Repo Rate)मध्ये 0.40 टक्क्यांची कपात करून ते 4 टक्क्यांवर आणले होते. यानंतर पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया (BOI) आणि यूको बँकेने रेपो आणि एमसीएलआर संबधित दर आधीच कमी केले होते. 1 जुलैपासून स्वस्त झाले आहे रेपो लिंक्ड रेट आधारित कर्ज

एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) चे दर देखील कमी केले आहेत.

(हे वाचा-आनंदाची बातमी! कोरोनाच्या संकटात 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ)

या दोन्ही दरांमध्ये 1 जुलैपासून 0.40 टक्के कपात लागू झाली आहे. या कपातीनंतर EBR 7.05 टक्क्यांवरून 6.65 टक्के आहे तर RLLR 6.65 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आले आहेत. 30 वर्षासाठी घेण्यात आलेल्या 25 लाखाच्या कर्जावर MCLR अंतर्गत मासिक हप्ता 421 रुपयांनी कमी होईल. त्याचप्रमाणे ईबीआर व आरएलएलआर अंतर्गत मासिक हप्ता 660 रुपयांनी कमी होईल.

MCLR म्हणजे काय? MCLR ला मार्जिनल काॅस्ट आॅफ लेंडिंग रेट असं म्हणतात. यात बँक आपल्या फंडाच्या गरजेप्रमाणे कर्जाचे दर नक्की करतात. हा एक बेंचमार्क दर आहेत. हे वाढले की बँकेकडून घेतलेली सर्व कर्ज महाग होतात. या दरांपेक्षा कमी दरात बँका लोन नाही देऊ शकत. त्यामुळे आता MCLR कमी झाल्याने आता बँकां कमी दरात कर्ज देण्यास सक्षम आहेत.

(हे वाचा-EXCLUSIVE : 'कोरोनानंतरचं अर्थसंकट वाटतं तेवढं गंभीर नाही, GDP घेणार U टर्न')

गृहकर्जापासून विकली लोनपर्यंत सर्व कर्ज स्वस्त होऊ शकतात. मात्र हा फायदा नवीन ग्राहकांबरोबर त्याच ग्राहकांना मिळेल ज्यांनी एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 8, 2020, 11:08 AM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या