मुंबई, 8 जानेवारी: टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaire Index) ताज्या आकडेवारीनुसार मस्क यांनी अॅमेझॉन (Amazon) कंपनीचे प्रमुख जेफ बेजोस (Jeff Bezos) यांना मागं टाकलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार मस्क यांच्याकडं आता 195 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
मस्क यांची ही वाटचाल सहज झालेली नाही. त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर टेस्ला कंपनी नीट काम करत नव्हती. त्यावेळी ते ही कंपनी विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गुरुवारी याच कंपनीमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. गुरुवारी टेस्ला कंपनीचे शेअर्स 4.8 टक्क्यांनी वधारले. त्यानंतर ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये नंबर 1 वर पोहचले.
(हे वाचा-पेट्रोल-डिझेल विकत घेताना वापरा SBI चे हे डेबिट कार्ड, मिळतील या ऑफर्स)
एलन मस्कसंबंधीची ही बातमी ‘टेस्ला ऑनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली’, या ट्विटर हँडलनं शेअर केली. त्यावर रिप्लाय मस्क यांनी सुरुवातीला ‘हाऊ स्ट्रेंज’ य़ा दोन शब्दामध्येच प्रतिक्रिया दिली. त्यापाठोपाठ त्यांनी 'ठीक आहे, आता पुन्हा कामाला लागूया' असं ट्विट केलं. त्यांचे हे दोन्ही ट्विट्स चांगलेच व्हायरल झाले असून त्याच्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
How strange
— Elon Musk (@elonmusk) January 7, 2021
Well, back to work …
— Elon Musk (@elonmusk) January 7, 2021
एलन यांच्या या ट्वीट्सवर नेटिझन्सनी देखील खूप ट्वीट केले आहेत. एलन यांचा शांत आणि तितकाच विचित्र रिप्लाय अनेकांना आवडला आहे.
haha such a quirky guy!!! https://t.co/OgJsSTTi70
— smy (@romafades) January 7, 2021
😂😂😂😂 What an absolute legend 👌 https://t.co/iCX6dgN3l7
— Toby (@TobyH2020) January 7, 2021
Elon musk be acting like he's shocked ...Teach me your ways sir https://t.co/qU6Io5Qe48 pic.twitter.com/NjMVrBJYaf
— PHOENIX 😈 (@Phoenix_tc_) January 7, 2021
Well Done Elon Raju! #ElonMusk #richestElon #Elon_Musk #elonmuskmemes #memesdaily #memes2021 #memes #MEMES #elonMask #muskmemes pic.twitter.com/uAtIQ4oqs5
— Sagar Thakkar (@BeingSmeet1012) January 8, 2021
2020 मध्ये 743 टक्के तेजी!
एलन मस्क यांना 2020 हे वर्ष चांगलंच फायद्याचं ठरलं. या वर्षात त्यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्सचे भाव चांगलेच वधारले. प्रॉफिट आणि S&P 500 इंडेक्समध्ये सहभागी झाल्यानंतर टेस्लाचे शेअर्समध्ये 2020 या एकाच वर्षात 743 टक्के वाढ झाली आहे.
(हे वाचा-सीमेवर कुरघोडी करणाऱ्या चीनचा देशातील FDI मोदी सरकारच्या काळात वाढला?हे आहे सत्य)
महामारीचा कोणताही परिणाम नाही
संपूर्ण जगाला 2020 मध्ये कोरोना महामारीचा (Corona Pandemic) फटका बसला. मस्क हे त्याला अपवाद ठरले. मस्क नोव्हेंबर महिन्यात बिल गेट्स (Bill Gates) यांना मागं टाकतं सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यावेळी त्यांची संपती 128 अब्ज डॉलर होती. गेल्या 12 महिन्यांमध्ये मस्क यांच्या संपत्तीमध्ये 150 अब्ज डॉलर (जवळापास 11 लाख कोटी रुपये) इतकी वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Tesla, Tesla electric car