मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहकांसाठी आवश्यक बातमी! तुम्ही YONO APP वापरता का? होणार महत्त्वाचे बदल

SBI ग्राहकांसाठी आवश्यक बातमी! तुम्ही YONO APP वापरता का? होणार महत्त्वाचे बदल

एसबीआय (State Bank of India) योनो अ‍ॅपने नवीन व्हर्जन (New Version of YONO app) लाँच करण्याच्या दिशेने काम करत आहे.

एसबीआय (State Bank of India) योनो अ‍ॅपने नवीन व्हर्जन (New Version of YONO app) लाँच करण्याच्या दिशेने काम करत आहे.

एसबीआय (State Bank of India) योनो अ‍ॅपने नवीन व्हर्जन (New Version of YONO app) लाँच करण्याच्या दिशेने काम करत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 18 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय (State Bank of India) त्यांचा डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म योनो अ‍ॅपचे (YONO You Only Need One App) पुढील व्हर्जन (New Version of YONO app) आणण्याच्या विचारात आहे. त्या दृष्टीने बँकेचे काम देखील सुरू आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) चेअरमन दिनेश खारा (Dinesh Khara) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

इंडस्ट्री बॉडी असणाऱ्या आयएमसी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका बँकिंग कार्यक्रमात दिनेश खारा यांनी अशी माहिती दिली आहे की, बँकेने योनो ची सुरुवात केली होती, तेव्हा ते रिटेल सेगमेंटमधील प्रोडक्ट्सच्या डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म स्वरुपात वापरले जात असे. त्यांनी असे म्हटले की, 'एसबीआय आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी योनोच्या क्षमतेचा वापर करू शकेल. विशेषत: जिथे आमच्याकडे रिटेल ऑपरेशन्स आहेत. आम्ही व्यवसायासाठी योनो देखील वापरू शकतो.'

हे वाचा-SBI ALERT! हे काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड भरण्यासाठी राहा तयार

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खारा यांनी असे म्हटले की, 'आता आम्ही यावर विचार करत आहोत की या सर्व सुविधांना योनोच्या पुढील व्हर्जनमध्ये एकत्र कशाप्रकारे आणले जाईल. यावर आम्ही काम करत आहोत आणि लवकरच या सुविधा सर्वांसमोर आणल्या जातील.'

हे वाचा-आवडत नाही आधार कार्डावर असणारा PHOTO? या सोप्या स्टेप्स फॉलो करून करा बदल

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2020-21 वार्षिक रिपोर्टनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत योनो (YONO) जवळपास 7.96 कोटी लोकांनी डाउनलोड केलं होतं. शिवाय 3.71 कोटी युजर्सनी याकरता नोंदणी देखील केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असल्याने, बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बदल झाल्यास त्याचा कोट्यवधी ग्राहकांना फायदा होणार आहे.

First published:

Tags: SBI, SBI bank, SBI Bank News