बनावट वेबसाइटबाबतही SBI ने केलं सावधान याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याच्या नावाने सुरू असलेल्या बनावट वेबसाइट बद्दलही अलर्ट केलं होतं. या वेबसाइटवरून येणाऱ्या नोटिफिकेशनबाबत सावधान राहण्यासाठी हा अलर्ट पाठवण्यात आला होता. तसंच या वेबसाइटवर जर तुम्ही तुमचा पासवर्ड सेट केला किंवा खात्यासंबंधीत माहिती पोस्ट केली तर तुमचं खातं रिकामं होण्याची भीती आहे. (हे वाचा-Gold Rates: आतापर्यंत 7927 रुपयांनी उतरलं सोनं, वाचा काय आहेत नवे दर) त्याचप्रमाणे काही वेळा थेट फोन करूनही ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात घ्या, बँकेकडून किंवा बँक अधिकाऱ्यांकडून तुमचे बँकिंग डिटेल्स किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी फोन केला जात नाही. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या भामट्यांबरोबर ओटीपी, डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, या कार्डांवरील सीव्हीव्ही, तुमचा एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड कधीच शेअर करू नका. बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. याशिवाय YONO अॅप वापरून देखील तुम्ही विविध सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे. फसवणूक झाल्यास सायबर क्राइम पोर्टलवर दाखल करा तक्रार तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला राज्याचे नाव लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि OTP टाकावा लागेल. तुम्ही नवीन युजर असल्यास याठिकाणी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणीवेळी मोबाइल क्रमांकSBI customers are requested to be alert on Social Media and not fall for any misleading and fake messages.#SBI #StateBankOfIndia #CyberSecurity pic.twitter.com/V8MyFKJBrc
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 30, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.