Gold Rates Today: आतापर्यंत 7927 रुपयांनी उतरलं सोनं, वाचा काय आहेत मंगळवारचे दर

Gold Rates Today: आतापर्यंत 7927 रुपयांनी उतरलं सोनं, वाचा काय आहेत मंगळवारचे दर

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीवर तणाव आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्यानंत आज दर 48273 प्रति तोळा झाले आहेत. अर्थात आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 7927 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 डिसेंबर: कोरोना व्हायरसवरील लशीबाबत (Coronavirus Vaccine)सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने स्वस्त झाले आहे आणि याचा देशांतर्गत बाजारावरही परिणाम झाला आहे. आज सुरुवातीच्या घसरणीनंतर झालेल्या तेजीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित बदल झाला आहे. प्रति तोळा सोन्याची किंमत 45 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर 407 रुपयांनी वाढले.

कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या लशीच्या आशेमुळे भविष्यातील जागतिक आर्थिक वाढीच्या संभाव्यतेत सुधारणा झाली आहे, तर अमेरिकेने नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील कामकाजाची औपचारिक सुरुवात केली आहे. जानेवारीत ते अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यामुळे जागतिक आर्थिक वाढीच्या आशा निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे कमजोर आर्थिक धोरण आणि महागाईचा धोका यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याचीही शक्यता आहे. असे असले तरीही डॉलरची कमजोरी असूनही गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. जगातील अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर दोन वर्षांच्या नीचांकावर घसरला आहे.

(हे वाचा-चंदा कोचर यांना आणखी एक मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका)

सोन्याचे आजचे भाव (Gold Price, 01st December 2020)

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 45 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,273 रुपये प्रति तोळा झाले आहेत.  याआधीच्या सत्रात सोमवारी दर 48,228  रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1812 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीचे आजचे भाव  (Silver Price, 01st December 2020)

एचडीएफसी सिक्‍योरिटीजच्या माहितीनुसार चांदीच्या किंमतीमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 407 रुपये प्रति किलोने महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो  59,380 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 58,973 होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 23.24 डॉलर प्रति औंस आहेत.

वायदे बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे मंगळावारी एमसीएक्सवर देखील सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात एमसीएक्सवर फेब्रुवारीसाठी सोन्याची वायदे किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 48,070 प्रति तोळा झाली आहे. तर चांदी वायदे वायदे बाजारात 1.2 टक्क्याने वधारली आहे. यानंतर चांदीचे दर 60,977 प्रति किलोवर पोहोचले आहेत.

(हे वाचा-2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार! 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव)

सोमवारी संध्याकाळच्या सत्रात सोन्याची वायदा किंमत 0.4 टक्क्याने उतरली होती, तर चांदी देखील 0.2 टक्क्याने कमी झाली होती. ऑगस्टमध्ये 56,200 रुपये प्रति तोळाच्या उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्याचे दर उतरू लागले आहेत. फक्त नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर जवळपास 3000 रुपयांनी कमी झाले आहेत

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 1, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या