आता एका WhatsApp मेसेजवर दारात उभं राहणार ATM, वाचा काय आहे SBIची नवीन सेवा

आता एका WhatsApp मेसेजवर दारात उभं राहणार ATM, वाचा काय आहे SBIची नवीन सेवा

आता ATM बाहेर रांगेत उभी राहण्याचीही गरज नाही, वाचा कसा घ्याल SBIच्या या नवीन सुविधेचा लाभ.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सेवा आणत असतात. आता SBIने कोरोना संकटकाळात आपल्या ग्राहकांसाठी नवीन ATM सेवा सुरू केली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला एका WhatsApp मेसेज किंवा SBIला कॉल केल्यानंतर तुमच्या पत्त्यावर एक मोबाईल एटीएम (Doorstep ATM Service) पोहचेल. एसबीआयने त्याचे नाव डोअरस्टेप एटीएम सर्व्हिस ठेवले आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने कोरोनापासून आपल्या ग्राहकांना वाचवण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे.

यासाठी SBIने आपल्या लखनऊमध्ये शाखेत याचे ट्रायल केले. लवकरत देशभरातील सर्व शाखांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. एसबीआयच्या लखनऊ सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार खन्ना म्हणाले की, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून एसबीआय डोर्स्टेप एटीएम सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लखनऊमध्ये 15 ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा-नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ कंपनी 300 ते 500 लोकांना देणार रोजगार

वाचा-डेबिट कार्ड विसरला असाल तरी देखील काढू शकता SBI ATM मधून पैसे, वाचा सविस्तर

त्यामुळे या सेवेअंतर्गत केवळ WhatsApp मेसेज किंवा कॉल करून तुम्हाला पैसे मिळतील. ही सेवा सध्या लखनऊमध्ये प्रायोगिकतत्वावर सुरू करण्यात आली आहे. हळुहळु देशातील इतर राज्यांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

वाचा-तुमच्या बँक खात्यावर आहे हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना

ATMमधून पैसे काढण्याच्या नियमांत झाला बदल

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1 जुलैपासून ATM पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. SBI आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य पैसे काढण्याची परवानगी देते. यामध्ये SBI 5 ATMमधून विनामूल्य व्यवहार आणि इतर कोणत्याही बँकेतून तीनवेळा पैसे काढू शकतो. इतर शहरांमध्ये 10 वेळा ATM मधून पैसे काढू शकता. त्यापैकी एसबीआयमधून पाचवेळा, तर इतर बँकांच्या ATMमधून पाचवेळा. बॅंक खात्यात सरासरी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बचत खातेधारक स्टेट बँक ग्रुप (SBG) आणि अन्य बँकांच्या ATM वर अमर्याद व्यवहार करण्यास परवानगी देतात.

Published by: Priyanka Gawde
First published: August 24, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या