नवी दिल्ली, 28 मार्च: देशातील सर्वात मोठी बँक असणारी SBI (State Bank of India) त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना सणासुदीच्या काळात एक खास भेट देत आहे. बँकेकडून ग्राहकांना स्वस्त कर्ज (Cheap Loan Facility) उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे तुम्हाला केवळ वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज कमी दरात मिळत नाही आहे तर बँकेकडून एकूण 5 प्रकारची कर्ज कमी दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बँकेने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, एसबीआय तुमच्या कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा आनंद घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी https://sbiyono.sbi या साइटवर जा
जाणून घ्या कोणते कर्ज किती व्याजदराने मिळते आहे गृहकर्ज एसबीआय सध्या 6.70 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. हा सर्वात कमी गृहकर्जावरील दर आहे. तुमची प्रॉपर्टी आणि सिबिलच्या आधारे यामध्ये बदल होऊ शकतात (हे वाचा- कायमची बंद होणार Air India? खाजगीकरणाबाबत मोदी सरकारने घेतला असा निर्णय ) वाहन कर्ज एसबीआय सध्या 7.50 टक्के दराने गाडीसाठी कर्ज देत आहे. एसबीआय 85 महिन्यांसाठी कार लोनची सुविधा देते, अर्थात तुम्ही सावकाश कार लोन फेडू शकता. ओव्हरसीज एज्यूकेशन लोन परदेशात शिक्षण घेण्याचा तुमचा विचार असेल आणि त्याकरता तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर 9.30 टक्के व्याजदराने EMI भरावा लागेल. (हे वाचा- 31 मार्चपूर्वीच करा ही महत्त्वाची 10 कामं, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम ) प्री अप्रुव्ह्ड पर्सनल लोन या कर्जासाठी तुम्हाला 9.60 टक्के दराने व्याज भरावे लागेल. इतर बँकांच्या तुलनेत हा दर कमी आहे. गोल्ड लोन एसबीआयकडून 7.50 टक्के दराने गोल्ड लोन दिले जाते. सोनं गहाण ठेवून तुम्ही बँकेकडून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. याकरता लागणारी कागदपत्र देखील कमी आहे.

)







