Home /News /money /

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी सरकारने DA मध्ये केली एवढी वाढ

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी सरकारने DA मध्ये केली एवढी वाढ

केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने दीड वर्षांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता देण्यात येतो तो रोखला होता. दरम्यान आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 जुलै: केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने दीड वर्षांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता देण्यात येतो तो रोखला होता. दरम्यान आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता  महागाई 17 वरून 28 टक्के करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meet) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा कोरोना कालावधीत वाढती महागाई दरम्यान सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल. किती हप्ते आहेत पेडिंग? केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते मिळणं बाकी आहे. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत. यामध्ये 1 जुलै 2021 चा हप्ता जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकूण चार हप्त्यांचं देय मिळणं बाकी आहे. त्यामुळे केंद्र सरकाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली होती. हे वाचा-CNG Price Hike: सामन्यांना मोठा झटका!CNG आणि घरगुती पाइपलाइन गॅसच्या किंमतीत वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जुलैपासून महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2020 साठी डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती. जुलै 2020 मध्ये 3 टक्के आणि जानेवारीमध्ये 4 टक्के अशी वाढ करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना 17 टक्के दरानेच डीए मिळत होता. कोव्हिडमुळे वाढीव डीए रोखण्यात आला होता.नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (National Council of JCM) केंद्र सरकारची संस्था आहे. नॅशनल काउंसिल ऑफ JCM ही केंद्रीय कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्त्व करणारी बॉडी आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Dearness allowance, Dearness relief, Money, Union cabinet

    पुढील बातम्या