नवी दिल्ली, 17 जून: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI ने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने केवायसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत ग्राहकांना सावध केलं आहे. बँकेने ट्वीट करत सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. बँकेने त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून असं म्हटलं आहे की हे फसवणूक करणारे नो यूअर कस्टमर (Know Your Customer) च्या व्हेरिफिकेशनच्या नावाखाली लोकांना लुबाडलं जात आहे. दरम्यान SBI ने सर्व ग्राहकांना 30 जूनपर्यंत KYC अपडेट करणं अनिवार्य आहे. असं न केल्यासं ग्राहकाचं अकाउंट सस्पेंड होऊ शकतं. SBI ने काय म्हटलं? बँकेच्या मते, फसवणूक करणारे आपले वैयक्तिक तपशील गोळा करण्यासाठी बँक/कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात आणि ग्राहकांना एक संदेश पाठविला जातो. ग्राहकांनी या संदेशास बळी पडू नये आणि केवायसीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. तसेच, जर एखाद्या ग्राहकाच्या बाबतीत असं काही घडलं तर त्याबद्दल त्वरित सायबर क्राइमला कळवा.
KYC fraud is real, and it has proliferated across the country. The fraudster sends a text message pretending to be a bank/company representative to get your personal details. Report such cybercrimes here: https://t.co/3Dh42ifaDJ#SBI #StateBankOfIndia #CyberCrimeAlert #StaySafe pic.twitter.com/VpODvKp1FD
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 15, 2021
बँकेने कोणत्या सूचना दिल्या आहेत? 1. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका 2. बँक केवायसी अपडेटसाठी केव्हाही लिंक पाठवत नाही 3. कुणाबरोबरही तुमचं मोबाइल आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नका हे वाचा- भारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क घरबसल्या करा केवायसी अपडेट कोरोना साथीच्या काळात एसबीआयने खातेदारांना केवायसीची कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना रहिवासी दाखल्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र नोंदणीकृत ईमेल अथवा पोस्टद्वारे पाठवावे लागेल. तुम्हाला कागदपत्रं त्याच मेल आयडीवरून पाठवावी लागतील जो मेल आयडी तुम्ही बँक तपशीलात दिला आहे. कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत त्या ईमेलवरून बँक शाखेच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी लागेल.