• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा लाभ, अशाप्रकारे मिळवा फायदा

SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा लाभ, अशाप्रकारे मिळवा फायदा

तुमचं जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 जून: केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची (Modi Government) अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल. तुम्ही SBI मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल. योजनेसाठी कोण पात्र? जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल. हे वाचा-NSDL च्या विधानानंतरही अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण सुरूच आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांसाठी फायद्याची स्कीम पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अनेक गरजू लोकांनी खाती उघडली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना आर्थिक सेवा, बचत खातं, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन जन धन खातं उघडू शकतात. तुमच्या बचत खात्याचं रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते. हे वाचा-Amazon, Flipkart विरोधातल्या तक्रारीचा त्वरित तपास करावा: CAIT चा सरकारला आग्रह विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्रं असणं आवश्यक -इन्शुरन्स क्लेम फॉर्म -मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी -अपघाताचा तपशील देणारा प्राथमिक किंवा पोलिसांचा अहवाल, त्याची मूळ किंवा प्रमाणित कॉपी -मृत्यू इतर कोणत्याही कारणामुळे झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत -कार्डधारक आणि नॉमिनीच्या आधार कार्डाची मूळ कॉपी
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: