मुंबई, 6 नोव्हेंबर : निवृत्तीनंतर (After Retirement Planning) प्रत्येकाला त्यांचे खर्च योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते. पगारदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो. पण असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना अशा कोणत्याही सुविधेचा लाभ मिळत नाही. तुम्हीही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत येत असाल आणि तुमच्या निवृत्तीचे नियोजन करत असाल, तर भारतीय पोस्टची PPF (Public Provident Fund) योजना तुमच्यासाठी निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरू शकते. या योजनेची संपूर्म माहिती घेऊया.
कोण आपले खाते उघडू शकतो?
इंडिया पोस्टच्या PPF योजनेंतर्गत (Post Office PPF Scheme), 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो आणि निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा घेऊ शकतो. याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पालकाद्वारे अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडता येते.
एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा Stock?
गुंतवणुकीची रक्कम
पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत, कोणतीही व्यक्ती एका वर्षात किमान 500 रुपयांचे खाते उघडू शकते. तसेच या योजनेअंतर्गत, तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेअंतर्गत, ठेवीदाराला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो.
Amazon Alexa : अॅमेझॉन अॅलेक्साचं `हे` खास फीचर 8 नोव्हेंबरपासून होणार बंद
मॅच्युरिटी कालावधी
या अंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांपर्यंत आहे. खाते उघडण्याचे वर्ष या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधीमध्ये गणले जात नाही.
व्याजदर किती आहे?
पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. हे व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ठेवीदाराच्या खात्यात जमा केले जाते. याशिवाय पीपीएफ योजनेंतर्गत मिळणारे व्याजही आयकराच्या कक्षेबाहेर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money