मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा Stock?

एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा Stock?

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Investment in Multibagger Stock) गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारातील (Investment in Share Market) गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) दरम्यानही जबरदस्त गुंतवणूक करण्यात आली आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Investment in Multibagger Stock) गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या मूल्याच्या तुलनेत (Share Market Return) अनेक पटींनी परतावा दिला आहे.

25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक (penny stock) म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी आहे. या समभागांची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे.

हे वाचा-PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी,पुढील हप्ता मिळण्यासाठी हे कार्ड आवश्यक

1 वर्षात 1,705 टक्के परतावा दिला

हा शेअर आहे ब्राइटकॉम ग्रुपचा (Brightcom Group). ब्राइटकॉम समूहाच्या शेअर्सनी एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 1,705 टक्के परतावा दिला आहे. 4 नोव्हेंबर 2020 रोजी हा शेअर 4.18 रुपयांवर बंद झाला, तर या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी या शेअरची किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 75.40 रुपयांपर्यंत वाढली. त्यामुळे तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हालाही मोठा फायदा मिळू शकतो.

1 लाखांचे झाले 18 लाख

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 18.03 लाख झाले असते. या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी शेअरने 90.55 रुपयांवर पोहोचून 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. मात्र, तेव्हापासून त्यात प्रॉफिट-बुकिंग दिसून येत आहे.

हे वाचा-उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतरही इंधन शंभरीपार, काय आहे आजचा भाव

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान 0.87 टक्क्यांनी वधारला शेअर

4 नोव्हेंबर रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगवेळी हा शेअर 0.87% वाढून 75.40 रुपयांवर बंद झाला. बीएसईवर एकूण 2.78 लाख शेअर्सनी 2.10 कोटी रुपयांचा व्यवहार केला. आयटी सॉफ्टवेअर फर्मची मार्केट कॅप 7,853.91 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

जाणून घ्या कंपनीबद्दल..

Brightcom Group Limited, पूर्वीची Lycos Internet Limited ही एक भारत-आधारित सेवा कंपनी आहे जी डिजिटल मार्केटिंग सेवा, संगणक सॉफ्टवेअर आणि सेवा प्रदान करते. कंपनी दोन विभागांतून काम करते: डिजिटल मार्केटिंग सेगमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेगमेंट. ही कंपनी एक जागतिक माहिती तंत्रज्ञान अंमलबजावणी आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदाता देखील आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market