नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : व्यवसाय (Business) करण्याचा विचार करत असाल, तर कमी पैशात अधिक नफा देणाऱ्या बिस्किटांचा व्यवसाय सुरू करू शकता. बिस्किट ही अशी गोष्ट आहे, जी नेहमीच डिमांडमध्ये असते. बिस्किटांची मागणी कमी होत नाही. लॉकडाउन काळात सर्व उद्योगांवर मोठा परिणाम झाला असताना, पारले जी बिस्किटांची इतकी मोठी विक्री झाली, की मागील 82 वर्षातील रेकॉड ब्रेड झाला. अशात बेकरी प्रोडक्ट बनवण्याचं यूनिट लावून (Biscuit Making Plant) व्यवसाय सुरू करणं चांगला पर्याय ठरू शकतो.
बेकरी इंडस्ट्रीसाठी (Bakery Industry) मोदी सरकारकडून मदत केली जाते. मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Scheme) व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक लाखांची गुंतवणूक करावी लागेल. एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम सरकारकडून मिळेल. यासाठी सरकारने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सरकारने व्यवसायाचं स्ट्रक्चरिंग केलं आहे. त्यानुसार, सर्व खर्च वगळता दर महिन्याला 40 हजार रुपयांहून अधिक नफा होऊ शकतो.
किती येईल खर्च?
या प्रोजेक्टसाठी एकूण खर्च 5.36 लाख रुपये असून यापैकी तुम्हाला स्वत:ला एक लाखांची गुंतवणूक करावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत तुमची निवड झाल्यास, बँकेतून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल. प्रोजेक्ट अंतर्गत तुमच्याकडे 500 स्क्वेअर फूट स्वत:ची जागा असावी लागेल. जर नसेल, तर जागा भाडे तत्वावर घेऊन प्रोजेक्ट फाइलसह दाखवावी लागेल.
किती होईल नफा?
सरकारने केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, 5.36 लाख रुपये एकूण वार्षिक उत्पादन आणि त्याच्या त्याच्या विक्रीचं अनुमान खालीलप्रमाणे असू शकतं -
4.26 लाख रुपये - संपूर्ण वर्षासाठी कास्ट ऑफ प्रोडक्शन
20.38 लाख रुपये - संपूर्ण वर्षात इतकं प्रोडक्ट तयार होईल, ज्याच्या विक्रीनंतर 20.38 लाख रुपये मिळतील. यात बेकरी प्रोडक्टच्या विक्रीची किंमत मार्केटमध्ये मिळणाऱ्या इतर प्रोजेक्ट रेटच्या आधारे काही कमी करुन ठरवण्यता आल्या आहेत.
6.12 लाख रुपये - ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट
70 हजार - अॅडमिनिस्ट्रेशन आणि सेल्स खर्च
60 हजार - बँक लोन व्याज
60 हजार - इतर खर्च
नेट प्रॉफिट - 4.2 लाख रुपये वार्षिक
मुद्रा योजना -
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करता येतो. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचं चालू इन्कम, किती कर्ज हवं अशी माहिती भरावी लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फीस किंवा गॅरंटी फीस द्यावी लागत नाही. लोन अकाउंट 5 वर्षात परत करावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.