हुंडाबळी? शिरूरमध्ये विवाहितेची आत्महत्या, पण मुलीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 12:47 PM IST

हुंडाबळी? शिरूरमध्ये विवाहितेची आत्महत्या, पण मुलीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

शिरूर, 4 जून : सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. अमृता तांबे असं मृत महिलेचं नाव आहे. पण ही आत्महत्या नसून तिची हत्या असल्याचा आरोप अमृताच्या माहेरच्यांनी केला आहे. 'पाच लाख रुपयांची मागणी करत सासू आणि नवरा माझ्या बहिणीचा सतत छळ करायचे', असा गंभीर तिच्या भावानं केला आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक केली नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू दिले जाणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेत अमृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला आहे. वर्षभरापूर्वीच थाटामाटात अमृताचं लग्न पार पडलं होतं.

(पाहा :SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?)

'एक जेसीबी असतानाही अमृताचा नवरा शरद आणखी एका यंत्रासाठी तब्बल पाच लाख रुपयांची वारंवार मागणी पत्नीकडे करत होता. सोमवारी (3 जून) सकाळीदेखील अमृतानं भावाला फोन करून याबाबत सांगितलं होतं. पण अखेर छळाला कंटाळून दुपारी बहिणीनं आत्महत्या केल्याचं समजलं', असा गंभीर आरोप अमृता भाऊ अनिल चव्हाणनं केला आहे. सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अमृतानं राहत्या घरी गळफास घेतला. सासू आणि नवऱ्यानं तिला मृतावस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर रात्री अमृताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

(पाहा :तुमची मुलं सुरक्षित आहेत? एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर)

अमृताचा नवरा आणि सासू पैशांची मागणी करत तिचा छळ करत होते. त्यामुळेच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप अनिल चव्हाणनं केला आहे. तसंच जोपर्यंत दोषींना अटक होत नाही तोपर्यंत अमृताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

Loading...

या प्रकरणी अद्याप शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: मोदींच्या 'जेम्स बॉन्ड'ला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा)

SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...