नवी दिल्ली, 8 मे : जर तुम्हीही एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एका चांगल्या व्यवसायाची संधी आहे. कमी बजेट, कोणता व्यवसाय करावा याबाबत गोंधळात असाल, तर एक असा व्यवसाय आहे, ज्यात मोठ्या मागणीसह नुकसानीची शक्यताही कमी आहे.
महिन्याला होईल 70 हजार कमाई -
डेअरी प्रोडक्ट्सचा व्यवसाय करता येऊ शकतो, ज्यात चांगला नफाही कमावता येतो. हा नेहमी बाराही महिने मागणी असलेला व्यवसाय आहे. डेअरी व्यवसायात तुमच्याकडील 5 लाख रुपये गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
मुद्रा लोन -
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकारही यात मदत करतं. छोट्या व्यवसायासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत लोन देतं. केवळ कर्जचं नाही, तर सरकार पैशांसह या प्रोजेक्टबाबतही संपूर्ण माहिती देतं.
डेअरी प्रोडक्टसाठी एकूण कॉस्ट 16.5 लाख रुपये आहे. परंतु सरकार या फंडच्या 70 टक्के लोन देतं. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला स्वत:कडून 5 लाख रुपये टाकावे लागतील. बॅक 7.5 लाख रुपये टर्म लोन आणि 4 लाख रुपये वर्किंग कॅपिटल रुपात देईल.
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार, डेअरी व्यवसायात वर्षाला 75 हजार फ्लेवर्ड मिल्कचा व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लीटर दही, 90 हजार लीटर बटर आणि 4500 किलोग्रॅम तूप असा व्यवसाय होऊ शकतो. म्हणजेच जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओवर होऊ शकतो. ज्यात 74 लाख रुपये कॉस्टिंग होईल, तर 14 टक्के व्याजानंतर जवळपास 8 लाखांची बचत होऊ शकते.
जागा -
डेअरी बिजनेस सुरू करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूट जागेची गरज लागेल. ज्यात 500 स्क्वेअर फूट प्रोसेसिंग एरिया, 150 स्क्वेअर फूटमध्ये रफ्रिजरेटर रुम, 150 स्क्वेअर फूटमध्ये वॉशिंग एरिया, 100 स्क्वेअर फूट जागा ऑफिस आणि इतर सुविधांची लागू शकते.
कच्चा माल -
दर महिन्याला 12,500 लीटर दूध खरेदी, 1000 किलोग्रॅम साखर, 200 किलोग्रॅम फ्लेवर्स, 625 किलो मसाले खरेदी करावे लागू शकतात. यासाठी 4 लाख रुपये लागतील.
नफा -
82.5 लाख टर्नओवर मध्ये वार्षिक गुंतवणूक 74.40 लाख रुपये आहे, ज्यात 14 टक्के व्याज सामिल आहे. म्हणजेच 8.10 लाख रुपये वार्षिक नफा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.