नवी दिल्ली, 8 मे : मे महिन्यात गॅस सिलेंडर बुक करायचा असेल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) केवळ 9 रुपयांत बुक करण्याची संधी मिळू शकते. म्हणजेच गॅस सिलेंडरवर एक-दोन नाही तब्बल 800 रुपयांची सूट मिळू शकते. पेटीएमकडून (Paytm) ही खास ऑफर देण्यात आली आहे.
Paytm ने ही कॅशबॅक ऑफर सुरू केली असून, ग्राहकांना एका गॅस सिलेंडर बुकिंगवर 800 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएमची ही ऑफर 31 मे 2021 पर्यंत लागू आहे.
काय आहे ऑफर -
पहिल्यांदाच पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांना पेटीएमची ही ऑफर मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिलं जाईल, ज्याची कॅशबॅक व्हॅल्यू 800 रुपये असेल. ही ऑफर ऑटोमेटेकली पहिल्या LPG सिलेंडरच्या बुकिंगवर अप्लाय होईल. या ऑफरचा लाभ कमीत-कमी 500 रुपयांच्या पेमेंटवर मिळेल.
ही कॅशबॅक रक्कम 10 रुपये ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. पेटीएमवर बिल पेमेंट केल्यानंतर एक स्क्रॅच कार्ड मिळेल, ते 7 दिवसांत वापरावं लागेल. त्यानंतर या स्क्रॅच कार्डचा वापर करता येणार नाही.
प्रोमो कोड -
- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी Paytm App नसल्यास, ते डाउनलोड करावं लागेल.
- त्यानंतर Show More वर जावं लागेल आणि रिचार्जवर क्लिक करावं लागेल.
- book a cylinder चा पर्याय दिसेल. येथे तुमचा गॅस प्रोव्हाईडर सिलेक्ट करा.
- बुकिंगआधी FIRSTLPG प्रोमो कोड अप्लाय करावा लागेल.
- 24 तासाच्या आत कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल, जे 7 दिवसांच्या आत वापरावं लागेल.
सध्या दिल्लीत 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या विना अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना 809 रुपये द्यावे लागतात. कोलकातामध्ये ही किंमत 835.50 रुपये आहे. तर मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईत ही किंमत 825 रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.