मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

SBI card Pulse हे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड 1,499 रुपयांच्या वार्षिक सबस्क्रिप्शन शुल्कासह येते. मात्र या कार्डद्वारे वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यू शुल्क माफ केले जाईल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : सध्याच्या धावपळीच्या काळात तुम्हाला निरोगी शरीर हवं असेल तर तुम्हाला योग्य काळजी घ्यावी लागते. तुम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देत असाल तर SBI कार्डने तुमच्यासाठी खास क्रेडिट कार्ड SBI Card PULSE लाँच केले आहे. SBI कार्ड, क्रेडिट कार्ड क्षेत्रातील एक प्रमुख बँकेला विश्वास आहे की ते आरोग्य आणि फिटनेस जागरूक कार्डधारकांच्या गरजा पूर्ण करेल. हे कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहे. याचा अर्थ व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन साइटवर कार्ड वापरले जाऊ शकते.

SBI card Pulse हे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड 1,499 रुपयांच्या वार्षिक सबस्क्रिप्शन शुल्कासह येते. मात्र या कार्डद्वारे वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यू शुल्क माफ केले जाईल. जॉइनिंग फी भरल्यानंतर कार्डधारकांना वेलकम बेनिफिट म्हणून 'नॉईज कलरफिट पल्स स्मार्टवॉच' (Noise ColorFit Pulse Smartwatch) मिळते. या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.4 इंच फुल कलर डिस्प्ले, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग (SPO2), स्लीप मॉनिटरिंग यांसारखी अनेक उत्तम फीचर्स आहेत.

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का?

ग्राहकांना आणखी काय मिळणार?

SBI कार्ड पल्स ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत Fitpass Pro सदस्यत्व मिळते. या अंतर्गत, ग्राहकांना देशातील 4,000 हून अधिक जिम आणि फिटनेस स्टुडिओच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल. याशिवाय कार्डधारकांना नेटमेड्स फर्स्टची एक वर्षाची मोफत सदस्यता देखील दिली जात आहे.

ट्रेडिंग अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून लोकप्रिय होत आहे

तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सही मिळतील का?

जेव्हा ग्राहक पल्स कार्डद्वारे फार्मसी, औषध दुकाने, जेवण आणि चित्रपटांसाठी खर्च करतात तेव्हा ते 5X रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात. याशिवाय, एका वर्षात 4 लाख रुपये खर्च केल्यावर, कार्डधारकांना Netmeds वर 1,500 रुपयांचे ई-व्हाउचर दिले जाईल.

First published:

Tags: Fitness, SBI