मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

गेल्या एका महिन्यात Cosmo Ferrites हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 225.70 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच्या शेअरहोल्डर्सना सुमारे 6 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले या तर पेनी स्टॉकची किंमत 28.30 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 डिसेंबर : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Penny Stock Investment) करणे खूप धोकादायक मानले जाते. मात्र जर कंपनीची फंडामेंटल मजबूत असतील तर ती कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना चांगला परतावा देऊ शकते. कॉस्मो फेराइट्सचा (Cosmo Ferrites) स्टॉक हे याचे ताजे उदाहरण आहे. 2021 मधील मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी (Multibagger Penny Stock) हा एक स्टॉक आहे. हा मल्टीबॅगर शेअर एका वर्षात 12 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे त्याच्या शेअर होल्डर्सना जवळपास 2000 टक्के परतावा मिळाला.

कॉस्मो फेराइट्स शेअरची प्राईज हिस्ट्री

गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 225.70 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच्या शेअरहोल्डर्सना सुमारे 6 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले या तर पेनी स्टॉकची किंमत 28.30 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत त्यात सुमारे 750 टक्के वाढ झाली आहे. पण वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा स्टॉक सुमारे 2000 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी या स्टॉकची किंमत फक्त 12 रुपये होती. तेव्हा आणि आताची तुलना केल तर स्टॉक 20 पट वाढला आहे.

तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल

किती पैसे वाढले?

जर तुम्ही या मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा स्टॉकची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज 1 लाख रुपये 1.06 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख गुंतवले असते आणि या कालावधीत त्याचे 1 लाख रुपये आज 8.50 लाख रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असेल, तर त्याने 12 रुपयांना हा स्टॉक विकत घेतला असता. आतापर्यंत त्याचे पैसे 20 लाखांपर्यंत वाढले असतील.

Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स

एका वर्षात, NSE निफ्टीने सुमारे 23 टक्के, तर BSE सेन्सेक्सने 21 टक्क्यांच्या जवळपास दिले आहेत. म्हणूनच, निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत पेनी स्टॉक्सने 2021 मध्ये खूप उच्च परतावा दिला आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market