मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करण्याची उद्या शेवटची संधी, जाणून घ्या 10 महत्त्वाचे फायदे

Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करण्याची उद्या शेवटची संधी, जाणून घ्या 10 महत्त्वाचे फायदे

सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्याकडे उद्याचा दिवस शेवटची संधी आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्याकडे उद्याचा दिवस शेवटची संधी आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्याकडे उद्याचा दिवस शेवटची संधी आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्याकडे उद्याचा दिवस शेवटची संधी आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे. 25 ऑक्टोबर 2021 पासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची सातवी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series-VII) सुरू झाली आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (25 ते 29 ऑक्टोबर) खुली आहे. अर्थात या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केला जातो.

सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या सातव्या सीरिजची इश्यू प्राइस 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात हे गोल्ड बाँड ऑनलाइन खरेदी केल्यास 4,715 रुपयांना मिळतील. 2 नोव्हेंबर रोजी हे बाँड इश्यू केले जातील, अर्थात SGB चे सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांना हे बाँड 2 नोव्हेंबर रोजी मिळतील.

हे वाचा-वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, डिझेल 111 वर

SGB चे 10 महत्त्वाचे फायदे

1. Sovereign Gold Bond चा सर्वात मोठा फायदा हा आहे की यात प्राथमिक गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के व्याज मिळते. सहामाही आधारावर गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात व्याज जमा केले जाते.

2. सॉव्हरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवेळी सोन्याचा बाजारभाव मिळण्याची आणि व्याज मिळण्याची खात्री असते.

3.  सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी संबंधित असते आणि एक्सचेंजेसवर ट्रेडेबल असते.

4. सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. त्यामुळे यात सॉव्हरेन गॅरंटी असते. याचा वापर कर्जासाठी होतो.

5. भौतिक सोने (Physical Gold) लॉकर इत्यादी सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशाप्रकारच्या सोन्याच्या चोरीची भीती देखील असते. परंतु SGB मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही ते लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च आणि चोरीचा धोका टाळू शकता.

हे वाचा-PolicyBazar आणि Paytm च्या येणाऱ्या आयपीओसाठी कशाप्रकारे कराल प्री-अप्लाय

6. सॉव्हरेन गोल्ड बाँडवर वस्तू आणि सेवा कर (GST on Gold) लावला जात नाही. सोन्याची नाणी, दागिने आणि सोन्याचे बार इत्यादींच्या खरेदीवर जीएसटी आकारला जातो. जेव्हा तुम्ही डिजिटल सोने खरेदी करता तेव्हा देखील तुम्हाला 3% GST भरावा लागतो.

7. तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता

8. SGB वरील व्याज करपात्र आहे, परंतु बाँड्सच्या रिडम्पशन वेळी भांडवली नफ्यावरील करावर इंडिव्हिज्युअल्ससाठी सूट मिळते.

9. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दागिने बनवण्यासाठी लागणारे शुल्क (Gold Making Charge) आणि शुद्धता यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

10. सरकारकडून विकले जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नगण्य आहे.

First published:

Tags: Gold, Gold bond, Gold prices today, Sovereign gold bond scheme