• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, तर डिझेल 111 रुपये; तपासा तुमच्या शहरातील भाव

वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, तर डिझेल 111 रुपये; तपासा तुमच्या शहरातील भाव

पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे पेट्रोल दर 120 रुपये लीटरवर पोहोचला आहे. तर डिझेल 112 रुपयांजवळ आहे. IOCL च्या नव्या रेटनुसार, आज पेट्रोल-डिझेल 35-35 पैशांनी महागलं आहे. दिल्लीत आज बुधवारी पेट्रोल 108.29 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल दर 97.02 रुपये प्रति लीटरवर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 120.52 रुपये आणि डिझेल 111.39 रुपये लीटर आहे. त्याशिवाय मध्यप्रदेशातही जवळपास सर्वच जिल्ह्यात पेट्रोल 120 रुपयांजवळ आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    रेशन दुकानांत मिळणार LPG Gas Cylinder? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

    चार महानगरांत पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 28 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 108.29 रुपये आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 114.14 रुपये आणि डिझेल 105.12 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 105.13 रुपये आणि डिझेल 101.25 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 108.78 रुपये आणि डिझेल 100.14 रुपये प्रति लीटर

    Price Hike : गृहिणींची बजेट आणखी कोलमडणार? साबण-शॅम्पू महागले

    कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेलचा भाव सतत वाढतो आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 22 हून अधिक वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ पाच ते सहा दिवस सोडून संपूर्ण महिन्याभर पेट्रोल-डिझेल दर वाढले आहेत.
    Published by:Karishma
    First published: