Sovereign Gold Bond: केवळ 4,662 रुपयांत खरेदी करा सोनं, मोदी सरकार देत आहे स्वस्त सुवर्णखरेदीची संधी

Sovereign Gold Bond: केवळ 4,662 रुपयांत खरेदी करा सोनं, मोदी सरकार देत आहे स्वस्त सुवर्णखरेदीची संधी

Sovereign Gold Bond: पुन्हा एकदा मोदी सरकारकडून स्वस्तात सोनेखरेदीची संधी मिळणार आहे. सरकार पुन्हा एकदा (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII ) घेऊन आले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी: जर तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या किंमती गेल्या काही काळापासून कमी होत आहेत, त्यातच सरकारकडून देण्यात येणारी सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII) तुम्हाला आणखी स्वस्त सोने मिळवून देऊ शकते. सोन्याच्या बाजारभावाच्या किंमतीपेक्षा काहीशा स्वस्त दरात ही सोनेखरेदी करता येते. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन (Sovereign Gold Bond) 01 मार्च 2021 ते 05 मार्च दरम्यान इश्यू करण्यात येत आहेत. अर्थात उद्यापासून तुम्ही हे सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकता. यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,662 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच प्रति तोळा सोनं तुम्हाला 46620 रुपये दराने मिळेल.

ऑनलाइन खरेदीवर मिळेल डिस्काउंट

याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,612 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

(हे वाचा-कोरोना लशीसह उद्यापासून लागू होणार हे बदल, सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम)

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ बेस्ट आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सध्या सोन्याच्या किंमती 18 टक्क्याने कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ऑल टाइम हाय स्तरावर होते. त्या दरापेक्षा आज सोन्याच्या किंमती 10500 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चांगली आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल.  याप्रकारच्या सोन्यात तुम्हाला फिजिकल स्वरुपात सोने मिळत नाही. आणि शुद्धतेबाबात बोलायचे झाले तर, हे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मिळत असल्याने शुद्धतेबाबत फसवणूक होण्याची शक्यता नाही आहे. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

कशी ठरते किंमत?

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

यावर तीन वर्षानंतर लाँग टर्म कॅपिटल टॅक्स गेन टॅक्स लागेल (मॅच्युरिटीपर्यंत ठेवल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही). शिवाय कर्जासाठी याचा उपयोग करू शकता.

(हे वाचा-नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक)

सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या प्रत्येक अर्जासाठी PAN आवश्यक आहे. सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून तुम्ही अर्ज घेऊ शकता, अर्थात हे बाँड खरेदी करू शकता. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 28, 2021, 1:58 PM IST

ताज्या बातम्या