नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक

नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. पॅन कार्ड (PAN Card) आधारकार्डाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी: पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. पॅन कार्ड (PAN Card) आधारकार्डाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केलेलं नसेल तर ताबडतोब हे काम करा. अन्यथा 31मार्चनंतर पॅनकार्ड आधारशी जोडलं जाणार नाही आणि ही प्रकिया पूर्ण न केलेल्या लोकांची पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून निष्क्रिय होईल. आधारकार्डला पॅनकार्ड जोडण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून, तुम्ही घरबसल्या देखील हे काम पूर्ण करू शकता. आधारकार्ड आणि पॅनकार्डवरील माहिती जुळत नसेल तरीदेखील एका यासाठी उपाय उपलब्ध आहे.

लिंक करण्याआधी UIDAI डेटा जुळवून पाहते

देशभरात हजारो नागरिकांना आधारकार्ड आणि पॅनकार्ड वरील माहिती जुळत नसल्याची समस्या भेडसावते आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपलं आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करायला जाते तेव्हा प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) UIDAI कडील डेटा पडताळून पाहतो. हा डेटा जुळून आला नाही तर त्या व्यक्तीचं आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक होत नाही.

(हे वाचा-सावधान!तुम्हालाही येत असेल 'हा' मेसेज तर पैसे होऊ शकतात चोरी, सरकारनं दिला इशारा)

डेटा जुळला नाही तर काय?

आधारकार्ड आणि पॅनकार्डचा डेटा जुळला नाही, तर तुमच्याकडे बायोमेट्रिक आधार ऑथेन्टिकेशन (Biometric Aadhaar Authentication) हा एकमेव पर्याय राहतो. यासाठी तुम्हाला NSDL च्या पोर्टलवरून आधार सीडिंग रिक्वेस्ट (Aadhaar Seeding Request) डाउनलोड करून जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आधार ऑथेन्टिकेशन प्रक्रिया करावी लागेल. जवळच्या आधार केंद्रावर किंवा वेबसाइटवर याविषयी अधिक माहिती मिळू शकते.

दुसरा पर्याय काय?

दुसरा पर्यायात एका पानाचा अगदी सोपा फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक आणि दोन्ही कागदपत्रांमध्ये दिलेले नाव भरावे लागेल. हे पूर्ण झाल्यानंतर आपण पॅन-आधार ऑनलाइन जोडू शकता.

(हे वाचा-आधार कार्डधारक महिलांसाठी LIC ची खास पॉलिसी; मिळणार ‘हे’ फायदे)

आधारकार्ड पॅनकार्ड लिंक केलं नाही तर काय?

31 मार्चपूर्वी आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. प्राप्तिकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेलं पॅनकार्ड वापरल्यास प्राप्तिकर कलम 272 ब अंतर्गत 10 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याचबरोबर बँकेत व्यवहार करणंदेखील अवघड होणार आहे. त्यामुळे करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं अत्यावश्यक आहे.

First published: February 27, 2021, 4:39 PM IST

ताज्या बातम्या