कोरोना लशीपासून ते बँक IFSC कोडपर्यंत... उद्यापासून बदलणार हे नियम, सामान्यांच्या जीवनावर थेट होणार परिणाम

कोरोना लशीपासून ते बँक IFSC कोडपर्यंत... उद्यापासून बदलणार हे नियम, सामान्यांच्या जीवनावर थेट होणार परिणाम

Rules Changing from 1st March: जाणून घ्या सोमवारपासून अर्थात 1 मार्चपासून कोणत्या महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम थेट सामान्यांच्या जीवनावर होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) महत्त्वाच्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होते आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी: दर महिन्याच्या सुरुवातील सामान्य माणसाच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या नियमात बदल होतात. काही गोष्टी नव्याने लागू होतात. मार्च 2021 मध्ये (Rules Changing from 1st March 2021) देखील काही बदल पाहायला मिळणार आहेत. कोरोना व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) मिळण्याचा पुढील टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे, शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील तसंच काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा (Primary School Starts from tomorrow) देखील सुरू होत आहेत. जाणून घ्या कोणते नियम उद्यापासून बदलत आहेत तर काय नवीन नियम उद्यापासून लागू होणार आहेत.

1. वयस्कर आणि आजारी व्यक्तींना मिळणार कोरोना लस

आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा 1 मार्चपासून लागू होणार आहे. उद्यापासून 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. 1 मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा (Coronavirus Vaccination Drive) हा पुढील टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तुम्हाला ही लस मोफत मिळेल तर खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.

(हे वाचा-सावधान!तुम्हालाही येत असेल 'हा' मेसेज तर पैसे होऊ शकतात चोरी, सरकारनं दिला इशारा)

2. बँक ऑफ बडोदामध्ये होतोय हा बदल

विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी (IFSC Code) कोड 1 मार्चपासून निष्क्रिय होईल. या बँकांच्या ग्राहकांना उद्यापासून नवीन IFSC कोड वापरावा लागणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) या दोन्ही बँका विलिन झाल्यामुळे ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. बँकेने याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना दिली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल 2019 पासून लागू झाले आहे. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक BoB चे ग्राहक आहेत.

3. या राज्यात उघडणार प्राथमिक शाळा

देशातील तीन राज्यांमध्ये उद्यापासून शाळा उघडणार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) 1 मार्चपासून उघडणार आहेत. तर हरियाणामध्ये ग्रेड 1 आणि 2 साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीसाठी शाळा आधीच उघडल्या आहेत.

(हे वाचा-नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक)

4. लागू होणार नवे LPG गॅस सिलेंडरचे दर

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Gas Cylinder Price) निश्चित करतात. 1 मार्च रोजी या किंमतीत बदल होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात एकूण तीन वेळा तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत.

5. SBI ग्राहकांना केवायसी करणं अनिवार्य

1 मार्चपासून एसबीआय ग्राहकांना केवायसी करणं अनिवार्य आहे. जे ग्राहक हे काम पूर्ण करणार नाहीत त्यांना विविध सरकारी योजनांचा किंवा इतर योजनांचा लाभ घेताला समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 28, 2021, 8:46 AM IST

ताज्या बातम्या