मुंबई, 21 जून : South India Bank Recruitment 2019: साउथ इंडिया बँकेत भरती सुरू झाल्यात. बँकेनं प्रोबेशन अधिकारी आणि क्लार्क या पदांवर भरती सुरू केलीय. एकूण 545 पदं आहेत. उमेदवारांनी southindianbank.com वर आॅनलाइन अर्ज करावा.
क्लार्क आणि प्रोबेशन आॅफिसर ( PO ) या दोन पदांसाठी आॅनलाइन अर्ज प्रक्रिया 19 जूनपासून सुरू झालीय. ती 30 जून 2019पर्यंत असेल. पीओ पदासाठी प्रवेश परीक्षा 25 जुलैला आयोजित केलीय.तर क्लार्कसाठी प्रवेश परीक्षा 26 जुलैला आहे. पीओ आणि क्लार्क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10वी, 12 वी आणि ग्रॅज्युएट 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उमेदवाराचं वय 25 वर्षांपेक्षा जास्त नको. आरक्षित वर्गासाठी वयाची 5 वर्षांची सूट आहे.
आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं
पदं आणि संख्या
क्लार्क - 385
पीओ - 160
वयाची मर्यादा - उमेदवाराचं वय 25 वर्षांपेक्षा जास्त नको. आरक्षित वर्गासाठी वयाची 5 वर्षांची सूट आहे.
आदिवासींमध्ये काम करायचंय? गडचिरोलीमध्ये 'या' पदांवर आहे भरती
अशी होईल निवड
उमेदवारांची निवड 3 फेऱ्यामध्ये होईल. यात ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यू असेल. यात मिळालेल्या गुणांवरून निवड केली जाईल.
EPFO मध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज
अर्जाची फी
सामान्य वर्गातल्या उमेदवारासाठी अर्जाची फी 800 रुपये आहे. एससी, एसटी उमेदवारांना अर्जाची फी 200 रुपये आहे. उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या माध्यमातूनही अर्ज फी भरू शकतात.
बँकेनं प्रोबेशन अधिकारी आणि क्लार्क या पदांवर भरती सुरू केलीय. एकूण 545 पदं आहेत. उमेदवारांनी southindianbank.com वर आॅनलाइन अर्ज करावा.
International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी