मुंबई, 20 जून : कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच EPFO मध्ये तुम्हाला नोकरी करायची संधी आहे. असिस्टंट पदासाठी भरती सुरू आहे. तुम्ही अर्ज आॅनलाइन करू शकता.एकूण पदं आहेत 280. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची डिगरी हवी. ती कुठल्याही विषयात चालेल. शेवटची तारीख आहे 25 जून 2019. याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे
पदाचं नाव - असिस्टंट
पदं - 280
शैक्षणिक पात्रता - उमेदवाराकडे कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेची किंवा विद्यापीठाची पदवी हवी
पगार - 44,900 रुपये.
पोस्ट ऑफिसच्या या 2 योजनांमध्ये गुंतवा पैसे, बँक FD पेक्षा जास्त फायदा
अर्जाची फी - सामान्य आणि ओबीसीसाठी 500 रुपये. तर एससी,एसटी, ईडब्लूएस, महिला, दिव्यांग यांच्यासाठी 250 रुपये. उमेदवार फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅकिंग, कॅश कार्ड आणि मोबाइल वॉलेट याद्वारे भरू शकतात.
उमेदवाराचं वय 25 जून 2019 ला 20 वर्ष ते 27 वर्षापर्यंत हवं.
दर महिन्याला 2 लाख रुपये कमवण्याचा हिट फाॅर्म्युला, 'असा' सुरू करा व्यवसाय
उमेदवाराची निवड प्राथमिक आणि मुख्य परीक्षेनं होईल. प्राथमिक परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातील. त्याला पर्यायही असतील. परीक्षेत इंग्लिश भाषेची परीक्षा घेतली जाईल. सोबत तर्कशास्त्र, गणित याबद्दलही प्रश्न असतील. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा देता येईल. यातही उत्तरांचे पर्याय असलेले प्रश्न विचारले जातील.
दर महिन्याला मिळेल 12,500 रुपयांची स्काॅलरशिप, मोदी सरकारची योजना
अधिक माहितीसाठी https://ibpsonline.ibps.in/epfoamay19/ या लिंकवर क्लिक करा.
EPFOमध्ये असिस्टंट पदासाठी 280 जागा आहेत. त्यात जनरल- 113, EWS- 28, OBC- 76, SC- 42, ST- 21 वर्गांसाठी नोकऱ्या आहेत.
उमेदवाराची निवड लिखित परीक्षा घेऊन केली जाईल. त्यात प्राथमिक परीक्षा आणि अंतिम परीक्षा यांचं आयोजन असेल. नोकरीसाठी निवड झालेल्यांचा पगार 44,900 रुपये असेल. 30 आणि 31 जुलै 2019 रोजी प्राथमिक परीक्षा असू शकते.
SPECIAL REPORT : 'किडनी घ्या पण, बियाणे द्या'