आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं

आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं

General Store, Resturant - सरकार सिंगल विंडो सिस्टमसारखा पर्याय शोधतंय

  • Share this:

मुंबई, 21 जून : आता देशात दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं अवघड नाही. यासाठी लागणाऱ्या काही मंजुरी मोदी सरकार कमी करण्याच्या विचारात आहेत. मोदी सरकार किराणा दुकान आणि रेस्टाॅरंट उघडण्यासाठी ज्या परवानग्या लागतात त्या कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या किराणा दुकान उघडण्यासाठी 28 परवानग्या लागतात. सरकार सिंगल विंडो सिस्टमसारखा पर्याय शोधतंय.

किराणा दुकान उघडायला लागतात परवानग्या

सध्या किराणा दुकान उघडण्यासाठी 28 मंजुरी मिळणं गरजेचं असतं. त्यात जीएसटी रजिस्ट्रेशनपासून शाॅप्स अॅण्ड इस्टॅब्लिशमेंट कायद्यापर्यंत, लायसन्स, कीटकनाशक आणि इतर गोष्टींची परवानगी अशा बऱ्याच गोष्टी लागतात.

'असा' करा योगाचा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

एक रेस्टाॅरंट उघडण्यासाठी 17 परवानग्या जरुरी

एक ढाबा किंवा रेस्टाॅरंट उघडण्यासाठी जवळजवळ 17 परवानग्या लागतात. यात आगीसाठी NOC, पालिकेकडून मंजुरी, म्युझिक लावण्यासाठी परवानगी यासाठी लायसन्स लागतं. याशिवाय फूड रेग्युलेटर FSSAI आणि हेल्थ डिपार्टमेंटकडूनही क्लियरन्स गरजेचा असतो. चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये रेस्टाॅरंट उघडण्यासाठी 4 क्लियरन्सच लागतात.

सोनं झालं महाग, गाठला 5 वर्षातला उच्चांक

लायसन्स रिन्यू करायची प्रक्रिया संपवणार

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड रिटेल ट्रेड (DPIIT) लायसन्स रिन्यू करायची प्रक्रिया रद्द करण्याच्या विचारात आहे. यामुळे छोटे व्यावसायिक, दुकानदार यांना दिलासा मिळू शकतो. त्यांना सरकारी कार्यालयात सारखं जावं लागणार नाही. जास्तीत जास्त लोक या व्यवसायाकडे वळतील, म्हणून सरकार हे पाऊल उचलतंय.

International Yoga Day: खुर्चीवर बसूनच करू शकता ही योगासनं, हवी फक्त 5 मिनिटं

याशिवाय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. रोजगार वाढवण्यासाठी सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्सच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केलेत. मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी 8वी उत्तीर्ण असल्याचं अनिवार्य नाही. सेंट्रल मोटर व्हेइकलच्या नियमानुसार ड्रायव्हर बनण्यासाठी 8वी उत्तीर्ण गरजेचं होतं.

वाघाची उंच उडी पाहून पर्यटक आवाक, VIDEO व्हायरल

First published: June 21, 2019, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading