जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आदिवासींमध्ये काम करायचंय? गडचिरोलीमध्ये 'या' पदांवर आहे भरती

आदिवासींमध्ये काम करायचंय? गडचिरोलीमध्ये 'या' पदांवर आहे भरती

आदिवासींमध्ये काम करायचंय? गडचिरोलीमध्ये 'या' पदांवर आहे भरती

Tribal, Recruitment - एकात्मिक आदिवासी प्रकल्प, गडचिरोली इथे 49 जागांवर भरती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : तुम्हाला गडचिरोलीत इथे नोकरी हवी असेल तर संधी आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प, गडचिरोली इथे  49 जागांवर भरती आहे. आदिवासी विकास विभाग इथे ही भरती आहे. शिक्षकांची ही पदं आहेत. उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षक (महिला) अशा पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे. पदं आणि पदांची संख्या उच्च माध्यमिक शिक्षक - 6 माध्यमिक शिक्षक -17 पदवीधर प्राथमिक शिक्षक - 3 प्राथमिक शिक्षक -21 अधीक्षक - 1 अधीक्षक (महिला) - 1 सोनं झालं महाग, गाठला 5 वर्षातला उच्चांक पोस्ट ऑफिसच्या या 2 योजनांमध्ये गुंतवा पैसे, बँक FD पेक्षा जास्त फायदा शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शिक्षक - M.Sc., B.Ed./ M.A., B.Ed माध्यमिक शिक्षक - B.A.,B.Ed./ B.Sc., B.Ed पदवीधर प्राथमिक शिक्षक - B.A., D.Ed. प्राथमिक शिक्षक - H.Sc., D.Ed. अधीक्षक - B.S.W. अधीक्षक (महिला)- B.S.W. EPFO मध्ये नोकरीची मोठी संधी, ‘असा’ करा अर्ज नोकरीचं ठिकाण गडचिरोली असेल. अर्जासाठी फी नाही. थेट मुलाखतीनंच निवड होईल. उच्च माध्यमिक शिक्षक  आणि माध्यमिक शिक्षक पदाची मुलाखत 23 जून 2019 रोजी होईल. पदवीधर प्राथमिक शिक्षक,  प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षक (महिला) पदासाठी मुलाखत 24 जून 2019ला होईल. दोन्ही दिवशी मुलाखती सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतील. मुलाखतीचं ठिकाण प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, जि. गडचिरोली  हे असेल. अधिक माहितीसाठी https://tribal.maharashtra.gov.in इथे क्लिक करा. आदिवासींमध्ये काम करून काही वेगळं करायचं असेल तर ही चांगली संधी आहे. VIDEO : लालबागच्या राजाचा पाद्मपूजन सोहळा, आदित्य ठाकरे होते हजर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात