• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • अमिताभ बच्चननंतर सोनू निगम NFT मध्ये गुंतवणूक करणार; जाणून घ्या एनएफटी म्हणजे काय?

अमिताभ बच्चननंतर सोनू निगम NFT मध्ये गुंतवणूक करणार; जाणून घ्या एनएफटी म्हणजे काय?

सध्या बाजारात NFT ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. एकापाठोपाठ एक बॉलीवूड स्टार्स ते क्रिकेटर्स आपले NFT लाँच करत आहेत. जेटसिंथेसिस कंपनीने प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) सोबत आता भारतीय संगीत उद्योगातील पहिली NFT सीरिज लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : सध्या बाजारात NFT ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. एकापाठोपाठ एक बॉलीवूड स्टार्सपासून क्रिकेटर्स आपले NFT लाँच करत आहेत. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनी जेटसिंथेसिसने (JetSynthesis) शुक्रवारी सांगितले की त्यांनी भारतीय संगीत उद्योगातील पहिली NFT सीरिज लॉन्च करण्यासाठी गायक सोनू निगमसोबत (Sonu Nigam) भागीदारी केली आहे. एका निवेदनानुसार, NFT सीरिजमध्ये सोनू निगमचा सिंगल 'हॉल ऑफ फेम', हा त्याचा पहिला अधिकृत इंग्रजी ट्रॅक समाविष्ट होणार आहे. हे फक्त एक टोकन नाही तर तुमच्यासाठी कमाई आणि गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय देखील असू शकतो. या नवीन ट्रेंडचा एक भाग बनून, तुम्ही देखील डिजिटल आर्टला NFT मध्ये रूपांतरित करुन विकू शकता. NFT ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून बनवले जातात. याच्या मदतीने, NFT डिजिटल कलेक्शनचा खरेदीदार त्या मालमत्तेचा कायमचा मालक राहू शकतो. NFT म्हणजे काय NFT म्हणजे नॉन फंगीबल (Non fungible token) टोकन आहे. NFT हे बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच क्रिप्टो टोकन आहे. NFT यूनिक टोकन आहेत, ही डिजिटल मालमत्ता आहे, जी मूल्य निर्माण करतात. उदाहरणार्थ, जर दोन लोकांकडे बिटकॉइन्स असतील तर ते त्यांची देवाणघेवाण करू शकतात. NFT डिजिटल मालमत्ता जसे कला, संगीत, चित्रपट, खेळ किंवा कोणत्याही कलेक्शनमध्ये मिळू शकतात. NFT कसे कार्य करते नॉन-फंगीबल टोकनचा वापर डिजिटल मालमत्ता किंवा एकमेकांपासून वेगळे न करता येणाऱ्या वस्तूंसाठी वापरले जाऊ शकतात. हे त्यांचे मूल्य आणि वेगळेपण सिद्ध करते. ते व्हर्च्युअल गेम्सपासून आर्टवर्कपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मंजुरी देऊ शकतात. स्टँडर्ड आणि ट्रेडिशनल एक्सचेंजेसमध्ये NFT ची खरेदी-विक्री करता येत नाही. याला डिजिटल मार्केटप्लेसमध्ये खरेदी किंवा विकले जाऊ शकते. कमाईची मोठी संधी! काय आहे NFT आणि कशाप्रकारे करतं काम? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं कोणत्या गोष्टींचा NFT मध्ये समावेश केला जाऊ शकतो? याच्या मदतीने डिजिटल जगात सामान्य गोष्टींप्रमाणे कोणतेही पेंटिंग, कोणतेही पोस्टर, ऑडिओ किंवा व्हिडिओ खरेदी-विक्री करता येते. त्या बदल्यात तुम्हाला NFT नावाची डिजिटल टोकन्स मिळतात. तुम्ही लिलावाची नवीन फेरी म्हणून NFT चा विचार करू शकता. कोणतीही कलाकृती किंवा मग अशी गोष्टी ज्याची जगात दुसरी कॉपी नाही, अशांना NFT करून लोकं पैसे कमवतात. तुमचा स्वतःचा NFT कसा तयार करायचा? तुमचा स्वतःचा NFT तयार करण्यासाठी, प्रथम तुम्हाला एक ऑनलाइन वॉलेट तयार करावे लागेल, ज्यामध्ये NFT ठेवता येतील. ज्या वॉलेटमध्ये क्रिप्टो मालमत्ता साठवली जाते ते 'प्रायव्हेट की'च्या मदतीने वापरता येते. ही Privet key सुपर सिक्योर पासवर्डप्रमाणे काम करते. याच्याशिवाय NFT मालक टोकनमध्ये प्रवेश करू शकत नाही. तुम्हाला हे वॉलेट मेटामास्क सारख्या सेवेशी लिंक करावे लागेल. यूट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची होणार ऑनलाइन विक्री, 14 वर्षांपूर्वी झाला होता लोकप्रिय भारताशी लिंक NFTs ची ‘हवा’ आता भारतातही वाहू लागली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतःचे NFTs सुरू केले आहे, ज्याची थीम त्यांच्या आयुष्याशी निगडित आहे आणि बीयाँडलाईफ नावाच्या व्यासपीठावर त्यांनी सादर केलेल्या त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची पौराणिक रचना मधुशाला मधील पद्यांचा देखील समावेश होतो. सनी लियोनी ही पहिली बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने तिचे युनिक, हँड-ॲनिमेटेड आर्टचे स्वतःचे NFT कलेक्शन सुरू केले आहे. सलमान खानने देखील NFTs मध्ये ‘एन्ट्री’ केली असून त्याच्या प्लॅटफॉर्मचे नाव बॉलीकॉईन ठेवले आहे. या रेसमध्ये क्रिकेटर्स तरी का बरे मागे राहतील? दिनेश कार्तिकने निदाहास T20 सीरिझ दरम्यान बांगलादेश विरोधात मारलेल्या अंतिम बॉल सिक्सला NFT मध्ये रुपांतरीत केले आहे. रिषभ पंतने रेरिओ जॉईन केले आहे, जे क्रिकेट संस्मरणीय वस्तू परवानाकृत करण्यासाठी, पंतच्या आयकॉनिक क्रिकेटिंग क्षणांचे अनन्य डिजिटल संग्रह तयार करण्यासाठी समर्पित व्यासपीठ आहे. Amazing! अवघ्या 12 व्या वर्षी या पठ्ठ्याने कमावले 3 कोटी रुपये, जाणून घ्या काय केलं काम?    येथे आपले स्टोअर तयार करा तुमचे वॉलेट MetaMask शी लिंक केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्वतःचे NFT तयार करू शकता. अधिक माहितीसाठी nftically.com या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Rahul Punde
  First published: