मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमाईची मोठी संधी! काय आहे NFT आणि कशाप्रकारे करतं काम? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

कमाईची मोठी संधी! काय आहे NFT आणि कशाप्रकारे करतं काम? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एनएफटी (NFT) हे नाव विशेष चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) वेगवेगळे एनएफटी लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घ्या NFT विषयी सर्वकाही..

गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एनएफटी (NFT) हे नाव विशेष चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) वेगवेगळे एनएफटी लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घ्या NFT विषयी सर्वकाही..

गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एनएफटी (NFT) हे नाव विशेष चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) वेगवेगळे एनएफटी लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घ्या NFT विषयी सर्वकाही..

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एनएफटी (NFT) हे नाव विशेष चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) वेगवेगळे एनएफटी लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या `एनएफटी` कलेक्शनवर पहिल्याच दिवशी 5.20 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3.8 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. हे फक्त एक टोकन नाही तर तुमच्यासाठी कमाई (Earning) आणि गुंतवणूक (Investment) करण्याचा चांगला पर्याय देखील असू शकतो. या नव्या ट्रेंडमध्ये सहभागी होत तुम्ही देखील डिजिटल आर्टचं (Digital Art) रुपांतर `एनएफटी`मध्ये करून त्याची विक्री करू शकता.

ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून `एनएफटी`ची निर्मिती केली गेली आहे. याच्या मदतीनं एनएफटी डिजिटल संग्रहाचा खरेदीदार त्या मालमत्तेचा कायमस्वरुपी मालक राहू शकतो.

प्रश्न : एनएफटी म्हणजे काय?

उत्तर : एनएफटी म्हणजे नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token). एनएफटी हे बिटकॉईन (Bitcoin) किंवा अन्य क्रिप्टो करन्सीप्रमाणं (Crypto Currencies) एक क्रिप्टो टोकन आहे. एनएफटी हे युनिक टोकन असतात. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता (Digital Assets) असून ती मूल्य निर्माण करते. उदाहरणार्थ, जर दोन लोकांकडे बिटकॉइन्स असतील तर ते त्यांची देवाणघेवाण करू शकतात. एनएफटी ही डिजिटल संपत्ती असून ती डिजिटल आर्ट, संगीत, फिल्म, गेम्स सारख्या डिजीटल मालमत्तेमधून मिळू शकते.

हे वाचा-34 रुपयांचा शेअर पोहोचला 130 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का हा Stock?

प्रश्न : एनएफटीचं काम कसं असतं?

उत्तर : नॉन फंजिबल टोकनचा वापर हा एकमेकांपेक्षा भिन्न असलेल्या डिजिटल मालमत्ता किंवा वस्तूंसाठी केला जातो. यामुळे त्या मालमत्ता किंवा वस्तुंचे मूल्य आणि किंमत स्पष्ट होण्यास मदत होते. यामुळे व्हर्च्युअल गेम्सपासून ते आर्टवर्क पर्यंतसर्व गोष्टींसाठी मंजुरी मिळते. स्टॅंडर्ड आणि ट्रॅडिशनल एक्सचेंजमध्ये `एनएफटी`ची खरेदी विक्री होत नाही. केवळ डिजीटल मार्केट प्लेसवरच (Digital Market Place) याची खरेदी विक्री होते.

प्रश्न : कोणत्या गोष्टींचा समावेश एनएफटीमध्ये करता येतो?

उत्तर : `एनएफटी`च्या मदतीनं तुम्ही डिजिटल जगात कोणतंही पेंटिंग, पोस्टर, ऑडिओ किंवा व्हिडिओ अगदी सामान्य वस्तुंप्रमाणं खरेदी किंवा विक्री करू शकता. या बदल्यात तुम्हाला डिजिटल टोकन मिळतं. या टोकनला एनएफटी असं म्हणतात. आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर एनएफटी ही लिलावाची आधुनिक पध्दत आहे. जगात ज्या कलाकृतीसारखी अन्य कोणतीही कलाकृती नाही, अशा कलाकृतीच्या माध्यमातून `एनएफटी`व्दारे लोक पैसे कमावू शकतात.

हे वाचा-सामान्यांसाठी खूशखबर! दिवाळीआधी स्वस्त झालं खाद्यतेल, मुख्य कंपन्यांनी घटवले दर

प्रश्न : स्वतःची एनएफटी कशी तयार करतात?

उत्तर : स्वतःची एनएफटी तयार करण्यासाठी आणि साठवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ऑनलाइन वॉलेट (Online Wallet) क्रिएट करावं लागेल. क्रिप्टो असेटस ज्या वॉलेटमध्ये स्टोअर केल्या जातात, त्यांचा वापर तुम्हाला प्रायव्हेटच्या मदतीनं करता येतो. हे प्रायव्हेट सुपर – सिक्युअर्ड पासवर्ड प्रमाणे काम करते. या प्रायव्हेटविना एनएफटी टोकन ओनर टोकन्स अक्सेस करू शकत नाही. हे वॉलेट तुम्हाला मेटामास्क सारख्या कोणत्याही सेवेशी लिंक करावं लागतं.

प्रश्न : कोणत्या ठिकाणी तयार करू शकता स्टोअर?

उत्तर : वॉलेट मेटामास्कशी लिंक केल्यानंतर तुम्ही स्वतः एनएफटी क्रिएट करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी nftically.com या लिंकवर क्लिक करावे.

अमिताभ बच्चन यांच्या `एनएफटी`नं मोडले सर्व विक्रम

अमिताभ बच्चन यांच्या एनएफटी कलेक्शनचा लिलाव एनएफटी प्लॅटफॉर्म Beyondlife.club ने आयोजित केला होता. याबाबत Beyondlife.club ने सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्या एनएफटी कलेक्शनने सर्व विक्रम मोडीत काढले. देशातील एनएफटीसाठीची ही सर्वाधिक बोली ठरली.

First published:

Tags: Money